आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतजमिनीवर एकरी ९५ हजार नव्हे, १ लाख ३७ हजार रुपयांंची घरपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात इंच अाणि इंच जमिनीवर करवाढ करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविराेधात उद्रेकाचे वातावरण असताना अाता एकरी ९५ ते ९७ हजार नव्हे, तर राज्य शासनाच्या करासहीत जवळपास १ लाख ३७ हजार रुपयांची घरपट्टी लागणार असल्याचे नवीन गणित समाेर अाले अाहे. दरम्यान, याच गणिताअाधारे छाेटे क्षेत्र असलेले घरमालकांसह साेसायटी, धार्मिक संस्था, शाळांही कराच्या विळख्यात सापडणार असल्यामुळे शेतकरी अांदाेलनाचे रूपांतर अाता 'नाशिक बचाव' अांदाेलनात हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे. 


महापालिकेच्या जुन्या मिळकतींना निवासी क्षेत्रात ३३ टक्के, वाणिज्यमध्ये ६४ टक्के तर उद्याेगांना ८२ टक्के करवाढीचा नवीन प्रस्ताव फसल्यानंतर अायुक्त मुंढे यांनी अापल्या अधिकाराचा वापर करून १ एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकती, तसेच कर सुधारणेखाली शहरातील इंच अाणि इंच जमिनीवर मालमत्ता कर अाकारणीचा निर्णय घेतला हाेता. याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिककरांमध्ये संतापाची लाट अाली. त्याबाबत लाेकप्रतिनिधींनी दिलासा देण्याची मागणी केल्यावर ती फेटाळून लावली गेली. महापाैर रंजना भानसी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळास खुशाल मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा सल्ला दिला गेल्यामुळे अाता सारेच हतबल झाले अाहेत. 


तिकडे नाशिकराेड भागात शेतकऱ्यांनी करवाढीविराेधात मेळावा घेऊन रणशिंग फुंकले अाहे. पाठाेपाठ पाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांचा गुरुवारी मेळावा हाेणार अाहे. दरम्यान, अाता शेतकऱ्यांचा उद्रेक अाणखी वाढण्याची भीती असून यापूर्वी एकरी साधारण वार्षिक ९५ ते ९७ हजार रुपयांची जी घरपट्टी अपेक्षित धरली हाेती, तिची व्याप्ती अाता एक लाख ३७ हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याचे समाेर अाले अाहे. शेतकरी अांदाेलनाशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी नवीन गणिताबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली अाहे. 


तुमच्या क्षेत्राचा असा काढा हिशेब 
१ एकर क्षेत्राचे साधारण ४३ हजार चाैरस फूट हाेतात. महापालिकेने पूर्वी ३ पैसे प्रति चाैरस फूट प्रतिमहा असलेले दर अाता १३ पटीने वाढवत ४० पैसे प्रतिचाैरस फूट प्रतिमहा केले अाहेत. त्यामुळे ४३ हजार चाैरस फुटांचा ४० पैसे प्रति चाैरस फूट प्रतिमहा याप्रमाणे हिशेब केल्यास मासिक १७ हजार २०० रुपये इतकी घरपट्टी येते. वार्षिक हिशेब केल्यास २ लाख ९ हजार ८८ रुपये इतके हाेतात. त्यात १० टक्के घसारा धरल्यास हीच रक्कम १ लाख ८८ हजार १७९ रुपये इतकी हाेते. अाता त्यात महापालिकेची या कर याेग्य मूल्यावर अाधारित घरपट्टीच्या ५४ टक्के अाकारणी गृहित धरल्यास साधारण ९५ ते ९७ हजारापर्यंत रक्कम जात हाेती; मात्र गणितानुसार ५४ टक्के नव्हे तर शासकीय कर धरून ही वाढ ७३ टक्के इतकी जाईल. त्यामुळे एकरी साधारण १ लाख ३७ हजाराच्या अासपास घरपट्टी येईल. तुमचे क्षेत्र जितके तितकी घरपट्टी याप्रमाणे सहज काढता येईल. 


अशी अाहे ७३ टक्के वाढ 
क्षेत्र : १ एकर ( ४३ हजार चाैरस फूट, दर : ४० पैसे चाैरस फूट प्रतिमहा) 
सर्वसाधारण कर ३६ टक्के ६७,७४४ रक्कम 
अाग कर २ टक्के ३७६४ रक्कम 
वृक्ष कर १ टक्के १८८२ रक्कम 
जल लाभ कर ४ टक्के ७५२७ रक्कम 
सर्वसाधारण स्वच्छता कर ६ टक्के ११,२९१ रक्कम 
मलनिसारण लाभ कर १० टक्के १८८१८ रक्कम 
रस्ता कर ५ टक्के ९४०९ रक्कम 
मनपा शिक्षण कर ३ टक्के ५६४५ रक्कम 
शासन शिक्षण कर ६ टक्के ११, २९१ रक्कम 
करवाढी विराेधात विविध ठिकाणी मेळावे 
१२ एप्रिल, सायंकाळी ६ : अार. के. लाॅन्स, पाथर्डी फाटा 
१५ एप्रिल, सकाळी ९ : मारुती मंदिर, अाडगाव, सकाळी ११ : श्रीराम मंदिर, मखमलाबाद 
१६ एप्रिल, सायंकाळी ६ : खरबंदा पार्क, द्वारका 
१७ एप्रिल, सायंकाळी ६ : विठ्ठल मंदिर, विहितगाव 
१८ एप्रिल, सकाळी ९ : साैभाग्य मंगल कार्यालय, सातपूर 
१९ एप्रिल, सायंकाळी ५ : म्हस्के गार्डन, चेहेडी 
२१ एप्रिल, सायंकाळी ५ : सीटू भवन, खुटवडनगर 

बातम्या आणखी आहेत...