आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड: गीतांजली जात असताना रुळाला सेमीचे तडे, दुर्घटना टळली; 35 मिनिटांनंतर वाहतूक सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक वरून मुंबई-हावडा सुपरफास्ट गीतांजली एक्स्प्रेस ताशी ११५ च्या वेगाने जात असताना मोठा आवाज होऊन रुळाला सेंटिमीटरचा तडा गेला. परंतु, त्यावेळी केवळ चार बोग्या पास होणे बाकी असल्याने गाडी वेगात निघून गेल्याने कुठलीही दुर्घटना झाली नाही. रेल्वे सुरक्षा दल, वरिष्ठ अधिकारी, रेल पथ कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुळाला दोन्ही बाजूने जोडणी लावून दुरुस्ती केली. ३५ मिनिटांनंतर वाहतूक सुरू झाली. तपमानाचा पारा ८.६ वर घसरल्याने रुळाला तडा गेल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 


मंगळवारी सकाळी १०.२५ च्या सुमारास स्टेशनमास्टर कार्यालयासमोर ही घटना घडली. गीतांजली एक्स्प्रेसला मनमाडला थांबा नसल्याने ती वेगाने जात होती. स्थानकावरील वेंडर अल्ताफ सरदार मनियार विजय भागवत पगारे यांनी मोठा आवाज एेकून स्टेशनमास्टर कार्यालयात धाव घेत माहिती दिली. 


अधिकाऱ्यांनी सर्व लोहमार्गाची तपासणी केली असता रुळाला तडा गेल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे सुरक्षा बल अधिकारी रजनीश यादव, आर. के. मीणा, अधिकारी पी. एस. पाटील, के. एस. सोनवणे, डी. व्ही. कांबळे आदी अधिकारी घटनास्थळी होते. 

बातम्या आणखी आहेत...