आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावसह मनमाडला अवकाळी पावसाची हजेरी, पहिल्या पावसाचा सुखद धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवेळी पावसाचे आगमन झाले. लासलगावमध्ये अर्धा तास पाऊस सुरू होता. उन्हामुळे असह्य झालेल्या लासलगावकरांना या पहिल्या पावसाने सुखद धक्का दिला. 


लासलगाव शहरात सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. तपमानामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता होती. सायंकाळी पाच वाजता तुरळक पावसाचे आगमन झाले. त्यानंतर सुमारे अर्धा तास पाऊस पडला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी तारांबळ उडाली. पावसाचा वेग फारसा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. 


मध्यंतरी लासलगाव शहराचे तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे असह्य झालेल्या उन्हाळ्यामुळे लासलगावकरांना अचानक आलेल्या पावसामुळे काहीसा सुखद धक्का मिळाला आहे. याचबराेबर मनमाडमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरळक पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उष्मा अधिकच भडकला. दुपारी कडक उन्हाळ्यामुळे शुकशुकाट दिसत हाेता. 

बातम्या आणखी आहेत...