आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने राज्यात ६ ते ९ जुलै या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. या काळात नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज अाहे. जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 


पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार ६ ते ७ जुलै या काळात मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. रविवारी (८ जुलै) विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी (९ जुलै) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. 


१६ राज्यांत अलर्ट जारी 
हवामान खात्याने १६ राज्यांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, गुजरात, तेलंगण, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अासाम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरामचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...