आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनपूर्व पाऊस शहरात दणक्यात; कामांच्या दैनेतून भविष्याची चुणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शहरात बुधवारी (दि. ६) मध्यरात्री काेसळलेल्या जाेरदार मान्सूनपूर्व पावसाने शहरवासीयांना वाढत्या उष्म्यापासून दिलासा दिला; मात्र नाशिकसह परिसरात या अल्पशा पावसानेही पाणी तुंबण्यासह वीज गायब हाेण्याचा अनुभव अाल्याने नाशिककरांना पावसाळ्याची चुणूकच पहायला मिळाली अाहे. महापालिका अाणि महावितरणने केलेल्या पावसाळापूर्व कामांचा दर्जाही पहिल्याच पावसाने उघडा पाडला. हवामान केंद्रात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण असून काही तासांमध्ये त्याचे कोकणात अागमन होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पाऊस सुरू हाेता. पावसासोबत वाराही असल्याने शहरात अडीच-तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाला सुरुवात हाेताच मध्य नाशिक, महात्मानगर, गंगापूररोड, इंदिरानगर, राजीवनगर, भाभानगर, द्वारका, उंटवाडी, सातपूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, सिडको, कामटवाडे, सिन्नरफाटा, नांदूर-मानूर, पंचक, जेलरोड, लामरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प, भगूर, लहवित, एमआयडीसी परिसर, पाथर्डी या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. 


पुढे काळजी घेऊ 
सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. तसेच काही ठिकाणी तपासणीसाठीही वीजपुरवठा बंद केला जातो. दरवर्षी पावसाळापूर्व कामे केली जातात. परंतु, भविष्यात पडणाऱ्या पावसामध्ये शक्यतो वीजपुरवठा खंडित करावा लागणार नाही यासाठी उपाययोजना केली जाईल. 
- बी. के. जनवीर, मुख्य अभियंता, महावितरण 


एवढी कामे हाेतात तरीही... 
महावितरण कंपनीतर्फे दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी इन्सुलेटर तपासणी, लोंबकळणाऱ्या वीजतारा ओढणे, झाडांच्या फांद्या तोडणे, आॅइल तपासणी करणे, विद्युत तारा एकमेकांवर आदळू नये म्हणून तिन्ही तारांमध्ये सुरक्षित कव्हर लावणे आदी कामे केली जातात. या कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित होताे. 

बातम्या आणखी आहेत...