आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीताई लिमये यांचे निधन; विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या ४० वर्षांपासून प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अविरत कार्य करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका रजनीताई नागेश लिमये यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातपूर येथील मुथा हॉस्पिटल येथे मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजनीताईंच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान आणि नेत्रदान केले गेले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव प्रबोधिनी विद्यामंदिर, पंडित कॉलनी येथे ठेवण्यात अाले हाेेते. 


उद्या शोकसभा.. 
रजनीताई लिमये यांची शोकसभा पंडित कॉलनी येथील प्रबोधिनी विद्यामंदिर येथे १८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...