आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापारी, बाजार समिती, अधिकाऱ्यांसह खुद्द सहकारमंत्र्यांचीच मिलीभगत -राजू शेट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील २० व्यापाऱ्यांनी १४७९ शेतकऱ्यांचे ४.५ काेटी रूपये थकवण्याचे प्रकरण गाजत असतानाच रविवारी नाशिक दाैऱ्यावर अालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी अतिशय अाक्रमक दिसले. व्यापारी, बाजार समितीचे संचालक, सहकार विभागाचे अधिकारी अाणि खुद्द सहकारमंत्री यांचीच मिलीभगत असून त्यातून शेतकऱ्यांची लूट हाेते अाणि सरकार मात्र, बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.


राज्यात १ मेपासून शेतकरी सन्मान अभियान 
शेतकऱ्यांचा सातबारा काेरा होण्यासाठी कर्जमाफी अाणि हमीभाव अशा दाेन विधेयकांचा अंतिम मसुदा १९३ शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन तयार केला अाहे. ३२ पक्षाचे नेतेही या बैठकीला हजर हाेते. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बाेलविण्याची मागणी पंतप्रधान अाणि राष्ट्रपतींकडे करणार अाहे. अात्महत्या नकाे संघर्ष करु, हे समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचणार अाहे. यासाठी १ मेपासून शेतकरी सन्मान अभियानाची सुरूवात मंत्रालयात अात्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथून सुरू होणार अाहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...