आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला पळवून केला अत्याचार; नात्यातील युवकानेच केले दुष्कर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी- माळे दुमाला येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी एका संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे. 


याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारी रोजी श्रावण हरी डगळे (२२, सोनगाव, ता. दिंडोरी) याने माळेदुमाला (ता. दिंडोरी) येथील नात्यातील अल्पवयीन मुलीस पेट्रोलपंप दाखव असे सांगून तिच्या राहत्या घरून घेऊन गेला. मुलगी घरी न परतल्यामुळे घरच्यांनी (दि. १३) वणी पोलिसात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली.

 

वणी पोलिसांनी या दोघांनाही पारेगाव (ता. चांदवड) येथून ताब्यात घेतले. संशयीताने पिडीतेस माळे दुमाल्याहून नाशिक, जालना, मनमाड, शिर्डी आणि पारेगाव येथे नेले. दरम्यान, पिडीतेवर संशयीत आरोपीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी संशयीतास वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध वणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...