आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काेटा पूर्ण न हाेणे हे अपयशच’; संमेलनाध्यक्ष निवडणुकीत पराभूत उमेदवारांच्या प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतांचा काेटा पूर्ण करण्यासाठी ४३४ मतांची गरज हाेती, मात्र लक्ष्मीकांत देशमुख यांना ४२९ मते मिळाली. म्हणजे विजयी उमेदवारालाही काेटा पूर्ण करता अाला नाही. हे जिंकलेल्या उमेदवाराचे अपयशच अाहे,’ अशी प्रतिक्रिया संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार रवींद्र शाेभणे यांनी व्यक्त केली. शाेभणे यांना ३५७ मते मिळाली.  ‘या निवडणुकीत मी दुसऱ्या क्रमांकावर अाहे. स्पर्धक म्हणून सगळी ताकद पणाला लवाली, अगदीच चाैथ्या-पाचव्या नंबरवर गेलाे नाही. यश-अपयश हा भाग वेगळा अाहे. मी देशमुख यांचे अभिनंदन करतो,’ असे शाेभणे म्हणाले. 

 

अध्यक्ष झालाे नसलाे तरी लिखित भाषण देणार : सानप

‘मी जरी पराभूत झालाे असलाे तरी एका अध्यक्ष न झालेल्या सारस्वताचे अध्यक्षीय भाषण मी समाजासमाेर पुस्तिकेच्या रूपात ठेवणार अाहे, असे  पराभूत उमेदवार किशाेर सानप म्हणाले.

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, काय म्‍हाणाले रवींद्र  शोभणे आणि रवींद्र गुर्जर...

बातम्या आणखी आहेत...