आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस लाखांच्या लुटीचा मास्टर माइंड कंपनीचा माजी कर्मचारी; सिटी सेंटर मॉल परिसरात लुटली हाेती रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिटी सेंटर मॉलसमोरील दरोडा प्रकरणात कंपनीच्याच कामगाराने नियोजनबद्ध प्लॅन करून रक्कम लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने या लूटप्रकरणी सहा संशयितांना अटक केली. २८ मे रोजी २० लाख ४५ हजारांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखत डोक्यात लोखंडी सळई मारून ही लूट करण्यात अाली होती. 


पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, कंपनी सोडलेला कामगार आतिष उत्तम कराटे (२३) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत संशयित जितेंद्र रवींद्र शेटे, सनी मन्सूर शेख, शुभम हरिशंकर यादव व प्रशांत रवींद्र शेटे यांनी ही लूट केल्याचे निष्पन्न झाले. ब्रिक्स इंडिया प्रा. लि. कंपनी दररोज व्यावसायिकांकडून रकमा जमा करून बँकेत भरणा करण्याचे काम करते. कंपनीचे कर्मचारी अक्षय कैलास बागूल अाणि विशाल महेंद्र निकुंभ नेहमीप्रमाणे सिटी सेंटर मॉल येथून २० लाख ४५ हजार ३९८ रुपयांची रक्कम जमा करून बँकेत भरणा करण्यासाठी वृंदावन अपार्टमेंटसमोर तीन संशयितांनी प्लाझा बिल्डिंग कुठे आहे असे विचारत पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती.


असा रचला कट 
कंपनी सोडलेला संशयित आतिष कंपनीमध्ये असताना पैशांचे कलेक्शन करण्याचे काम करत होता. रक्कम जमा केल्यानंतर कुठे घेऊन जातात, याची सर्व माहिती त्यास होती. प्रशांत कानडे या कर्मचाऱ्याने जितेंद्र शेटे, सनी शेख, शुभम यादव यांना कामावर लावले होते. पाच संशयित आणि एक अल्पवयीनाने रक्कम लुटण्याचा कट रचला. चौघांनी परिसरात पाळत ठेवली. जितेंद्र आणि सनी या दोघांनी रक्कम लुटली. 


गोव्यामध्ये मौजमजा 
संशयितांनी लूट केल्यानंतर हिरावाडीतील त्रिकोणी बंगला येथे पैशांचे वाटप केले. दोघे गोव्याला मौजमजा करण्यासाठी निघून गेले. काही शहरातच लपले होते. यातील कानडे रविवार कारंजा येथे हाणामारीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. 

बातम्या आणखी आहेत...