आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डरच्या घरी भरदिवसा 19 लाखांची घरफोडी; माहितगार व्यक्तीने पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीत राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी भरदिवसा १७ लाखांची रक्कम सुमारे सव्वा लाखांच्या दागिन्यांची चाेरी करण्यात अाली. 


दर्शन किशोर रुमाले (रा. अर्चित निकेतन, महात्मानगर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि. ७) त्यांच्या पत्नी माहेरी आणि आई-वडील बाहेरगावी, तर रुमाले नेहमीप्रमाणे पाथर्डी फाटा येथील बांधकाम साइटच्या ऑफिसात गेले होते. दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान चोरांनी इमारतीतील फ्लॅट क्र. चे सेफ्टीडोअर लॉक आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप कटावनीच्या साह्याने तोडून कपाटात ठेवलेली १७ लाख ५० हजारांची रक्कम आणि पत्नीचे सहा तोळे साेन्याचे एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र चोरले. 


गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील, गुन्हे शाखा युनिट चे निरीक्षक आनंद वाघ यांच्यासह पथकाने पाहणी करून तपास सुरू केला. 


महात्मानगरातील या इमारतीच्या पहिल्याच मजल्यावर दिवसा घरफोडी करण्यात अाल्याने गंगापूर पोलिसांच्या गस्तीवर संशय व्यक्त केला जात अाहे. 


कामवाल्या बाईने दिली घरफोडीची माहिती 
रुमालेयांच्याकडे घरकामास असलेल्या महिलेने रुमाले यांच्या पत्नी अर्चना यांना फोन करून, ‘घराचा दरवाजा उघडा असून सामान अस्ताव्यस्त पडलेले अाहे’, असे कळवले. राणेनगर येथे माहेरी गेलेल्या अर्चना यांनी दुपारी वाजता फोन पतीला घरफोडीबाबत कळवले. रुमाले घरी आल्यानंतर त्यांना कपाटातील लाखाेंची रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती गंगापूर पोलिसांना दिली. 


अन्य वस्तूंना हातही लावला नाही... 
ही घरफोडी पाळत ठेवून केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. चोरट्यांनी फक्त कपाटात ठेवलेली रक्कम आणि दागिने चोरले. घरातील अन्य वस्तूला हातही लावला नसल्याने ही चोरी माहितगार व्यक्तीने पाळत ठेवून केली असल्याचा संशय तपासी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 


कपाट, दरवाजावर सापडले ठसे 
घरफोडीच्यागुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा युनिट १, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने इमारतीपासून काही अंतरावर माग काढला. येथून संशयित वाहनातून फरार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घरातील कपाट, दरवाजा आणि इतर काही वस्तूंवर ठसे सापडले अाहेत. परिसरातील बंगल्यावर असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...