आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेबल टेनिसच्या सरावासाठी आता अनोखा रोबोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा संकुलात खेळाडूंच्या सरावासाठी एका अनाेख्या राेबाेटचा शुभारंभ करण्यात आला. स्थायीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून निवड झालेल्या हिमगौरी आहेर-आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत या रोबोटचे औपचारिक उद‌्घाटन मंगळवारी (दि. १०) करण्यात आले. रोबोटच्या माध्यमातून येणाऱ्या विविध वेगाने येणाऱ्या बॉलचा सामना करून टेबल टेनिसचा चांगला सराव करू शकत असल्याने अाता नाशिकच्या टेबल टेनिसपटूंना आधुनिक पद्धतीने सराव करता येणार अाहे. 


शिवसत्य संकुलात अनेक वर्षांपासून टेबल टेनिसचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात विविध वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षक शशांक वझे यांच्या वतीने नियमित प्रशिक्षण दिले जाते.


उच्च दर्जाचा सराव 
बुद्धिबळाचा चांगला सराव मिळण्यासाठी खेळाडू ऑनलाइन खेळून कौशल्यात वाढ करू शकतो, क्रिकेटमध्ये बाॅलिंग मशिनचा वापर करून त्याद्वारे वेगवेगळ्या वेगाने आणि टप्प्याने चेंडू फेकला जातो. त्याचप्रमाणे टेबल टेनिसचा खेळाडू या रोबोटमधून येणाऱ्या विविध प्रकारच्या वेगाने येणाऱ्या बॉलचा सामना करून टेबल टेनिसचा तसेच स्पिनचा उच्च दर्जाचा चांगला सराव करू शकतो, असे यावेळी वझे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...