आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढ साैम्य करण्यासाठी सत्ताधारी भाजप-विराेधी पक्ष अाता 'साथ-साथ'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील इंच न‌् इंच जमिनीला लावलेल्या तुघलकी करवाढीतून दिलासा देण्यासाठी विराेधी पक्षांच्या मंगळवारी (दि. १७) झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांनी सहभाग नाेंदवल्यामुळे अाता करवाढीविराेधाला धार वाढली असून १९ जुलै राेजी हाेणाऱ्या महासभेत अाता पहिलाच विषय करवाढ हा ठेवण्यात येणार अाहे. या मुद्यावर नियाेजनबद्ध व काेणताही गाेंधळ न घालता वेळ पडली तर मध्यरात्रीपर्यंत चर्चा घडवून निर्णय घेण्याची तयारी विराेधकांनी दाखवली अाहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने काेणतीही भूमिका व्यक्त न करता पालकमंत्र्यांशी चर्चा करून तसेच बुधवारी 'पार्टी मिटींग'मध्ये भूमिका घेण्याची रणनिती ठरवली अाहे. दुसरीकडे, भाजपने भूमिका बदलली तर करवाढ रद्द हाेइपर्यंत महासभाच चालू न देण्याची तयारी विराेधकांनीही केली अाहे. 


१ एप्रिल २०१८ पासून शहरात अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकती तसेच माेकळ्या भूखंडांना कंबरताेड अशी करवाढ लागू करण्यात अाली. तत्पूर्वी जुन्या मिळकतीचे कर याेग्य मूल्यात १८ टक्के वाढ केल्यामुळे मागील व अाताच्या देयकात जवळपास ३८ टक्के रकमेचा फरक अर्थातच वाढीचा फटका बसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दुसरीकडे, माेकळ्या भूखंडात येणाऱ्या शेती क्षेत्राला तर एकरी १ लाख ३७ हजार रुपये एकर इतकी वाढ हाेणार असल्यामुळे निषेध मेळावे हाेवू लागले. त्यानंतर २३ एप्रिलला विशेष महासभा घेवून करवाढीला स्थगिती देण्याबाबत निष्फळ प्रयत्न झाला. दरम्यान, विधानपरिषद निवडणूक अाचारसंहितेचा अडसर दूर झाल्यानंतर हाेणाऱ्या पहिल्याच महासभेत अाता, करवाढीचा मुद्दा चर्चेला येणार अाहे. विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांच्या दालनात काँग्रेसचे गटनेते शाहु खैरे, मनसे गटनेते सलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, शिवसेना गटनेते विलास शिंदे, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंेढे, अपक्ष नगरसेवक तथा माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासारख्या विराेधी पक्षातील नेत्यांसह चक्क सभागृहनेता दिनकर पाटील व भाजप गटनेते संभाजी माेरूस्कर हेही उपस्थित हाेते. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात अाली. त्यात प्रामुख्याने, तत्कालीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात मंजूर झालेल्या प्रस्तावानुसारच, नवीन मिळकती व माेकळ्या भूखंडाच्या सध्याच्या करदरात ४० टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी एकमताने मंजूर झाली. त्यामुळे ३ पैसे प्रतिचाैरस फुटावर ४० टक्के वाढ गृहीत धरून ०४.२० पैसे इतकी वाढ अपेक्षित अाहे. त्यामुळे ३ पैसे प्रतिचौरस फुटावरून थेट ४० पैसे चाैरस फुट इतकी वाढ रद्द करण्याबाबत एकमत झाल्याचे वृत्त अाहे. 


दरम्यान या बैठकीनंतर 'रामायण' येथे महापाैर रंजना भानसी यांची शिष्टमंडळाने एकत्रित भेट घेतली. बैठकीतील सर्व मुद्याबाबत एकत्रितरित्या माहिती देत महासभेत त्यानुसारच कामकाज चालू द्यावे अशी विनंती केली. भाजपची पार्टी मिटींग बाकी असल्यामुळे महापाैरांनी काेणतीही भूमिका जाहीर केली नाही. यावेळी उपमहापाैर प्रथमेश गिते व स्थायी समिती सभापती हिमगाैरी अाडके -अाहेर या उपस्थित हाेत्या. 


भाजपची काेंडी अाज फुटणार ; पालकमंत्र्यांशी चर्चा करणार 
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत अाठ दिवसात करवाढीसह विविध मुद्यावर दिलासा देण्याचे अाश्वासन दिले हाेते. तत्पूर्वीच १९ जुलै राेजी महासभा हाेणार असल्यामुळे विराेधकांसाेबत करवाढीला विराेध करायचा की पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करायची असा पेच भाजपसमाेर अाहे. 'मी नाशिककर' या झेंड्याखाली विराेधकांसमवेत उतरल्यास पालकमंत्र्यांच्या अादेशाचा अवमान केल्याची टिका हाेण्याची भाजपला भिती अाहे. दरम्यान, भाजपमधील एका पदाधिकाऱ्याच्या माहितीनुसार, विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप हे पालकमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असून त्यांच्याकडून महासभेत याेग्य ताे निर्णय घेण्याबाबत अधिकार दिले जातील. दरम्यान, बुधवारी पक्षाच्या महासभापुर्व बैठकीत अंतिम निर्णय हाेणार अाहे. 


तोपर्यंत विरोधीपक्ष सभागृह सोडणार नाही 
करवाढ रद्द करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक झाली असली तरी, त्यांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. ते निश्चितच दिलासादायी निर्णय देतील. मात्र, महापालिकेशी संबंधित विषय असल्यामुळे महासभेतून करवाढ फेटाळण्याबाबत प्रथम निर्णय घेवून त्याद्वारे पालकमंत्र्यांना साेप्या अादेशाबाबत बळ दिले जाईल. करवाढ रद्द हाेईपर्यंत विरोधी पक्ष सभागृहातून उठणार नाही. 
-अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता, महापालिका. 


गाेंधळ न घालता नियाेजनबद्ध चर्चेची तयारी 
या बैठकीत काेणताही अापसातील गाेंधळाचा फायदा प्रशासनला उचलता येणार नाही यादृष्टीने व्यूहरचना तयार करण्यात अाली. त्यानुसार, सर्वच पक्षाचे गटनेते प्रथम भूमिका मांडतील. त्यानंतर गटनेत्यांच्या पत्रावर क्रमवारीनुसार काेणाला बाेलण्यासाठी संधी द्यायची याची माहिती महापाैरांना दिली जाईल. त्यानुसार चक्राकार अावर्तनानुसार महापाैर अालटून-पालटून प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाला बाेलण्याची संधी 


दाेषी अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रस्तावाला बगल देण्याची रणनिती 
अंगणवाडी सेविकांना कमी करणे, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे खासगीकरण अादी मुद्यांवरून विराेधक अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, याच मुद्यावरून गाेंधळ घालून दाेषी अधिकाऱ्यांविराेधातील कारवाईच्या प्रस्तावाला बगल देण्याची रणनिती सर्वच पक्षातील काही नगरसेवकांनी मिळून मिसळून अाखल्याची चर्चा अाहे. त्यामुळे महासभा शांततेत पार पाडून दाेषाराेप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई तडीस नेण्याचे अाव्हान महापाैरांसमाेर असेल.

बातम्या आणखी आहेत...