आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरण 'बॉम्ब'ने उडवण्याच्या निनावी फोनने पोलिसांची धावपळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर धरण बॉम्बने उडवून देण्याचा निनावी फोन आल्याने पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सात वाजता तालुका पोलिस ठाण्याच्या लॅण्डलाइन नंबरवर फोन आला होता. शहर पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाने दोन तास धरण परिसरात तपासणी केल्यानंतर काही आढळून आले नाही. फोनला कॉलर आयडी नसल्याने पोलिसांना या निनावी फोनचा शोध घेण्यास अडचण येत आहे. 


पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निनावी फोन आला. गंगापूर धरण बॉम्बने उडवून देणार असल्याचे सांगत समोरील व्यक्तीने फोन बंद केला. फोनवर आलेल्या धमकीचे गांभीर्य घेत तालुका पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळवले. बॉम्बशोधक पथक सतर्क होत तात्काळ धरणाकडे रवाना झाले. दोन तास कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू अढळून आली नाही. ही अफवा असल्याचे पथकाच्यआ लक्षात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पणा देत पथक रात्री 10 वाजता धरणावरून परत आले. रात्री उशीरापर्यंत निनावी फोनचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...