आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्वाच्या नावाने मते घेणारेही हिरव्याचे पाईक : संभाजी भिडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रत्येक राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये उभी वा अाडवी हिरवी रेष असतेच. इतकेच नाही तर हिंदुत्वाच्या नावाने मते मागणारे पक्षही हिरव्याचे पाईक असतात. त्यामुळे काेणत्याही राजकीय पक्षाची वा केंद्र- राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण सिंहासनासाठी मदत घेतली जाणार नाही. त्यांनी मदत दिली तरी ती ठामपणे नाकारण्यात येईल अशी स्पष्टाेक्ती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी रविवारी येथे केली. रायगडावर येणाऱ्या हिंदूंच्या हातात शस्त्र असणे गरजेचे आहे. अाम्ही शस्त्रे हातात घेतल्यास लोकशाही वाचविण्याचा टाहो फुटेल, टीव्हीवरचे भाडाेत्री पाेपट बाेलायला लागतील असा टाेलाही त्यांनी यावेळी लगावला. 


विविध संघटनांनी विरोध केल्याने कडक सुरक्षेत रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात ही सभा पार पडली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन उभारण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' अशी तुकडी तयार केली जाणार आहे. यात दोन हजार धारकरी कार्यरत असतील, हे धारकरी रोज पहारा देतील, असेही भिडे म्हणाले. 


महिलांच्या सहभागास दर्शविला नकार 
नाशिक नगरीतून प्रत्येकी दाेन हजार धारकरी जमविण्याची जबाबदारी काेण घेणार असा प्रश्न भिडे यांनी करताच सभागृहातील एक महिला उभी राहिली. स्त्रियांना पुढे करुन रणांगणात जाण्याची इच्छा अामची नाही, असे सांगत त्यांनी महिलांच्या सहभागास स्पष्ट शब्दात नकार दिला. महिलांनी घरी जिजाऊंची भूमिका बजवावी असे अावाहनही त्यांनी केले. 

 

अाठच तालुका प्रमुखांची उपस्थिती

प्रत्येक तालुक्याची जबाबदारी एका धारकऱ्यावर देण्याच्या विचारात असलेल्या भिडे गुरुजी यांनी तालुकानिहाय धारकऱ्यांनी उभे रहावे असे अादेशित केले. मात्र केवळ सातच धारकरी उभे राहिल्याने त्यांनी उर्वरित अाठ धारकरी काेठे गेले असा संतप्त सवाल केला. नाशिकमधून प्रत्येकी दाेन हजार धारकऱ्यांना जमविण्याची जबाबदारी काेण घेणार असा प्रश्न केला. मात्र त्यालाही अल्प प्रतिसाद मिळत अवघे सहाच धारकरी जबाबदारी घेण्यासाठी उभे राहिले. या धारकऱ्यांवर नेतृत्व साेपवित त्यांच्याशी भिडे यांनी व्यासपीठावरच स्वतंत्रपणे चर्चा केली. 


भिडे उवाच...
हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्वाचा अभाव दिसताे छत्रपतींच्या नावाचा उपयाेग केवळ सत्ता मिळविण्यासाठीच हाेताे  १० काेटी २३ लक्ष लाेकसंख्येच्या महाराष्ट्रात १ काेटी ४३ लक्ष लिटर दारु पिणाऱ्यांची संख्या अाहे. व्यसनाधिन हाेऊन शिवजयंती साजरी करणाऱ्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारच नाही  बेगडी शिवभक्ती दाखविणारा हा लबाडांचा महाराष्ट्र अाहे  अाजवर अाईच्या गर्भातील बाळच व्यसनांपासून दूर हाेते; अाता अाईच दारु पित असल्याने गर्भातील अर्भकही नशेबाज हाेते गाेमाता, गंगामाता, गीता माता अाणि भारतमाता या जगातील सर्वाेच्च माता अाहेत मुलाला शिवचरित्र वाचायला लावणारा बाप लाखातही सापडत नाही जाे देश अापल्या पूर्वजांचा इतिहास वाचणार नाही ताे विश्वाच्या युध्दात वाचणारच नाही गुलामीच्या बंधातून बाहेर पडण्यासाठी मराठ्यांचा इतिहास शिकवावा लागेल शाकाहारी माणूस सर्वाधिक बुध्दीमान असताे. 


सोनिया गांधींवर टीकास्त्र 
देशातील हिंदूंना गुलामगिरीत राहण्याची सवयच जडली अाहे. उद्याचे पंतप्रधान इटलीतून अालेले असतील तरी अाम्हाला ते चालतील. गंभीर बाब म्हणजे अशा इटलीकरांना प्राेत्साहन देणाऱ्यांचा पक्ष स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवताे, असे सांगत त्यांनी साेनिया गांधींवर टीकास्त्र साेडले. 


बलात्काऱ्याला जीवंत ठेवायचे की नाही याचा निर्णय घेतलाय 
बलात्कार करणाऱ्याला जिवंत ठेवणारच नाही अशी भूमिका सरकार घेवाे अथवा न घेवाे, अाम्ही मात्र या संदर्भात निर्णय घेतला अाहे. ताे काय निर्णय असेल हे अागामी काळात समजेलच, अशीही घाेषणा संभाजी भिडे यांनी केली. 


असे असेल नियाेजन 
- सिंहासन अाणि शिवछत्राच्या पहाऱ्यासाठी प्रत्येक तालुक्यातील २ हजार धारकरी रायगडावर जाणार 
- प्रत्येक धारकरी पायात वाहन न घालता भगवा फेटा, कंबरेला तांबडा पट्टा अशा पेहरावात गडावर जाईल 
- नाशिकच्या लाेकसंख्येच्या प्रत्येक लाखात दाेन हजार धारकरी तयार करण्याची जबाबदारी येथील स्वयंसेवकांवर असेल 


शिवाजी महाराज हे दैवतच 
शिवाजी महाराज हे ३३ काेटी देवांचे देव हाेते. त्यांचे कर्तुत्व देवालाही लाजविणारे अाहे. त्यामुळे त्यांना देवत्व बहाल करणेच याेग्य असल्याची स्पष्टाेक्ती त्यांनी यावेळी केली. 


तब्बल साडेतीन तास चालले भाषण 
शिवचरित्र अाणि महाभारतातील संदर्भ देत भिडे यांचे भाषण तब्बल साडे तीन तास चालले. सायंकाळी ६ वाजता भाषणाला सुरुवात झाली अाणि ९.३५ वाजता भाषणाचा समाराेप झाला. भाषणादरम्यान उभे राहणाऱ्यांनाही भिडे गुरुजी रागवत हाेते. 

बातम्या आणखी आहेत...