आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावांनाे, जीवघेण्या सेल्फीपासून स्वत:ला वाचवा; अांबाेली घाटात काेसळूनही बचावलेल्या कुटुंबीयांचे अार्जव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- काेकणातील निसर्गरम्य व काळजाचा थरकाप उडविणाऱ्या डाेंगरदऱ्यांनी भरलेल्या अांबाेली घाटात पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळ्यात स्वर्गीय नंदनवनाची अनुभूती देताे. ६ जूनच्या बुधवारी पांढुर्ली येथील संपत महाले हा तरुण कुटुंब व मित्रांसह अांबाेली घाटात पाेहाेचला. घड्याळाचे काटे दुपारी ३.३० कडे सरकत हाेते. घनदाट ढगांनी वेढलेले अाकाश, वेड लावणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांचाच उत्साह अावेशात रुपांतरीत झाला. घाटाच्या मुख्य पाईंटकडे सरकत संपत सेल्फी काढू लागला. घनदाट झाडींनी वेढलेली, खाेल, दरीसह स्वत:ला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ताे न कळत मागे सरकला न सरकला ताेच निसरड्या जागेवरून पाय घसून खाली काेसळला. 


पत्नी छाया, सहा वर्षांचा मुलगा कृष्णा, दाेन वर्षांची मुलगी परी अाणि मित्र यांच्या डाेळ्यासमाेर संपतचे शरीर दरीत झेपावल्याने सर्वच घाबरून रडू लागले. त्यांना पाहून पर्यटकांच्या गाड्या थांबल्या. त्यांनी पाेलिसांना फाेन करून घटनेची माहिती दिली. याचवेळी संपतची पत्नी छायाने काैटुंबिक स्नेही सिन्नरचे सहायक पाेलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांना घटना कळविली. परदेशी यांनी त्वरेने अांबाेली पाेलिस, तेथील गिर्याराेहकांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे संपतच्या अायुष्याची दाेरी बळकट हाेत गेली. 


एव्हाना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सिन्नरचा तरुण अांबाेली दरीत काेसळल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ लागली. ७०० फूट खाेलीच्या अक्राळ-विक्राळ दरीत काेसळलेला काेणी जीवानिशी परत येत नाही, अशा भावनेने सगळेच या बातमीकडे नकारात्मक नजरेने पाहू लागले. पाेलिस व गिर्याराेहकांनी शाेधकार्य सुरू केले. धुक्याची धुंद पावसाच्या सरींचे अडथळे येत हाेते. छाया गाडीत बसून पती सुखरुप वाचावा म्हणून देवाचा धावा करत हाेती. सायंकाळी गिर्याराेहकांना यश अाले. ५०० फूट खाेल एका झाडावर संपत अडकल्याचे निदर्शनास अाले. 


गिर्याराेहकांपैकी एकजण डाॅक्टर हाेते. ताे जखमी असला तरी जीवानिशी सुखरुप असल्याचे पाहून त्यांनी अानंदातिशयाने ही वार्ता वाॅकीटाॅकीवर सहकाऱ्यांना कळविली. तेव्हा संपतची पत्नी छाया व सर्वांच्या अानंदाला सीमा राहिली नाही. सर्वजण संपत वर येण्याची वाट पाहू लागले. मात्र, पुन्हा पाऊस काेसळू लागला. फ्लडलाईट, दाेरखंड या सामग्रीच्या सहाय्याने पाऊस थांबताच संपतला रात्री ८ च्या सुमारास वर घेण्यात यश अाले. काेसळल्यानंतर तब्बल साडेचार तासांनी संपत सुखरूप वर अाला. 


रुग्णवाहिकेतून दवाखान्यात प्रथमाेपचार करून अधिक उपचारांसाठी गडहिंग्लज रुग्णालयात हलविण्यात अाले. संपत सुरक्षित असल्याचे पाहून सिन्नरहून तेथे पाेहाेचलेल्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. नाशिक येथे गुडघ्यावरील शस्त्रक्रिया, जखमा व मुक्या मारावर उपचार घेऊन संपत अाता अाराम करत अाहे. 'देव तारी त्याला काेण मारी...' हा वाक‌्प्रचार येथे तंताेतंत लागू झाला. 


सेल्फीचा विचार अजिबात नकाेच 
मी अपघातातून वाचल्याने नशिबवान ठरलाे. पण अशी संधी प्रत्येकाला, प्रत्येकवेळी मिळत नाही. म्हणून काेणीही जीवघेणा सेल्फी काढण्याचा विचार देखील करू नका. अापला जीव अाणि कुटुंबीयांना वाऱ्यावर साेडू नका, असे अार्जव करताे. 
-संपत महाले, पांढुर्ली, ता. सिन्नर