आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफाड तालुक्यात उष्माघातामुळे दुसरा बळी; चंद्रपूर सर्वात उष्ण, पारा 46.4 अंश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उगाव- उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाली असून गत पंधरवड्यात निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथे अठरा वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी एक वाजेदरम्यान उगाव येथील शेतमजूर ज्ञानेश्वर घमाजी नेहरे (वय ४८) यांचा शेतात काम करत असताना जागेवरच कोसळून मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे.


उष्माघाताचाच प्रकार 
नेहरे यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. कडक उन्हामुळे असे होऊ शकते किंवा हृदयविकाराचा धक्काही असू शकतो. परंतु, उन्हात काम करताना अचानाक कोसळून मृत्यू झाल्याने हा उष्माघाताचाच प्रकार आहे. 
-डाॅ. नितीन धारराव, निफाड मल्टीस्पेशालिटी रुग्णालय 


चंद्रपूर सर्वात उष्ण, पारा ४६.४ अंश 
पुणे- ष्णतेची लाट विदर्भात सर्वाधिक तीव्र आहे. विदर्भातील सर्व जिल्हे चाळिशीपार आहेत. ही लाट पुढील ४८ तास टिकून राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे ४६.४ अंश इतक्या तापमानाची नोंद रविवारी झाली. मराठवाड्यात परभणी येथे ४४.७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे उष्ण वारे मैदानी प्रदेशात प्रवेश करत आहेत. परिणामी विदर्भातील उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. येत्या २ दिवसांतही हवामान कोरडे राहणार असल्याने उष्णतेचा परिणाम टिकून राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...