आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीतील दुहेरी खून प्रकरण: गुंड पाप्या शेखसह बारा जणांना मरेपर्यंत जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुख्यात गुंड पाप्या शेख व त्याच्या इतर साथीदारांना येथील न्यायालयात आणताना पोलिस. - Divya Marathi
कुख्यात गुंड पाप्या शेख व त्याच्या इतर साथीदारांना येथील न्यायालयात आणताना पोलिस.

नाशिक - शिर्डीतील दोन तरुणांचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून एकमेकांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत त्यांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी नाशिकच्या विशेष माेक्का न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह त्याच्या टाेळीतील १२ साथीदारांना मरेपर्यंत जन्मठेपेची व प्रत्येकी सहा लाखांप्रमाणे एकूण १ काेटी ३४ लाखांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली. न्यायाधीश सुरेंद्र अार. शर्मा यांच्या न्यायालयात गुरुवारी (दि. ३) दाेन्ही बाजू एेकून घेत न्यायालयाने  २४ अाराेपींपैकी १२ अारोपींना शिक्षा सुनावत उर्वरित १२ जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त केले.   


१४ जून २०११ राेजी रात्रीच्या सुमारास शिर्डीतील रहिवासी प्रवीण विलास गोंदकर आणि रचित पटणी यांचे पाप्या शेख व त्याच्या साथीदारांनी १ लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांना राहता येथील एका हाॅटेलमध्ये नेले. संशयितांनी निमगाव येथील वाल्मीक जगताप याच्या शेतात नेऊन प्रवीण व रचित यांना लाेखंडी गजाने बेदम मारहाण केली.  यात प्रवीण आणि रचित यांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी प्रवीणचे वडील  विलास पंढरीनाथ गोंदकर (रा. बिरेगाव रोड, शिर्डी) यांच्या तक्रारीनुसार संशयितांविरोधात अपहरण, खंडणी अाणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. तत्कालीन अप्पर अधीक्षक सुनील कडासने यांच्या पथकने तपास करून २३ संशयितांना अटक केली. संशयितांची टाेळी अाणि त्यांच्याविरोधात २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने पोलिसांनी पाप्या शेख टोळीविरोधात मोक्कान्वये दाेषाराेपपत्र दाखल केले. 

 
अाराेपीचा जबाब ठरला महत्त्वाचा : या गुन्ह्यात पाेलिसांनी २४ अाराेपी केलेले असताना एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हाती लागला नव्हता. त्यामुळे परिस्थितिजन्य व वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या अाधारेच सरकार पक्षाने खटला चालवला. मात्र, अपर पाेलिस अधीक्षक कडासने व तत्कालीन उपअधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जमा केले हाेते. सरकारतर्फे ४५ साक्षीदार तपासण्यात अाले. अाठव्या क्रमांकाचा अाराेपी चिंग्या उर्फ समीर निझाम पठाण याचा कबुली जबाब न्यायालयासमाेर सिद्ध करून दाखवण्यात अॅड. मिसर यांना यश अाले. चिंग्या याने बारकुंड यांच्यासमाेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्याचा घटनाक्रम, दाेघांवर करण्यात अालेल्या अत्याचाराबराेबरच त्याची व्हिडिअाे क्लिप माेबाइलवर तयार करण्यात अाल्याची माहिती दिली. बारकुंड यांचीही साक्ष घेण्यात अाली. हाच जबाब गुन्हेगारांना शिक्षेसाठी महत्त्वाचा ठरला.  

 

मृतदेहाची विटंबना   
पाप्या व त्याच्या साथीदारांनी दोघांना जगताप मळ्यातील खाेलीत डांबून ठेवण्याबराेबरच त्यांचे कपडे काढून टाकले हाेते. दाेघांनाही एकमेकांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. तसेच लाेखंडी सळई, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत सिगारेटचे चटके देत संपूर्ण शरीरावर जखमा केल्या हाेत्या. यात दाेघांचा मृत्यू झाल्यावरही त्यांना दयमाया अाली नाही. शिर्डीत  दहशत निर्माण करण्यासाठी पाप्या शेख व साथीदारांनी दाेघांचे नग्न मृतदेह विटंबना करत भरचाैकात सकाळीच अाणून टाकले होते. 

 

अाराेपींचे क्रौर्य उघड 
दाेघा मित्रांचा अतिशय क्रूरपणे केलेला खून अाणि त्यांच्यावर केलेले अत्याचार न्यायालयात सिद्ध करून दाखवण्यात सरकारी पक्षाला यश अाले. यामध्ये अाराेपीचा कबुली जबाब अाणि माेबाइलचे छायाचित्रण उपयुक्त ठरले. पाेलिसांचा याेग्य तपास अाणि साक्षीदार ठाम राहिल्याने व काैशल्यपूर्ण युक्तिवादामुळे शिक्षेपर्यंत पाेहोचले. न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा अाणि १ काेटी ३४ लाखांपर्यंतचा दंडामुळे संघटित गुन्हेगारीवर जरब बसण्यात मदत हाेईल.
अजय मिसर, विशेष सरकारी वकील 

बातम्या आणखी आहेत...