आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीकडे रजनीकांतही नरेंद्र माेदींना घाबरतो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काेकणवासीयांचा विराेध असल्याने नाणार प्रकल्प खरे तर विदर्भात न्यायला हवा. नरेंद्र माेदींनी ठरवले तर हा प्रकल्प ते विदर्भातही नेऊ शकतात. किंबहुना त्यांनी ठरवले तर ते मुंबईचा समुद्रही विदर्भात उचलून नेऊ शकतात, असा टाेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माेदींना लगावला. नाशिकमध्ये रविवारी (दि. ६) झालेल्या पत्रकार परिषदेत बाेलताना 'अलीकडे स्टंटबाजीत रजनीकांतही माेदींना घाबरताे,' अशी मिश्किलीही त्यांनी केली. 


नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केली अाहे. त्यामुळे तेथे ग्रीन रिफायनरी अाता हाेणार नाही हे स्पष्ट झाल्याचे सांगत ते म्हणाले की, मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील काही अामदार हा प्रकल्प मागत अाहेत. अाशिष देशमुख यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे मंगळूर, गुवाहाटीसारख्या समुद्रकिनारा नसलेल्या सात ठिकाणी तेल शुद्धीकरणाचे कारखाने अाहेत. विदर्भ विकासाच्या पाेकळ घाेषणा करण्यापेक्षा तेथे असे प्रकल्प न्यावेत. या प्रकल्पासाठी समुद्रकिनारेच हवे असतील असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर माेदींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी ठरवले तर हा प्रकल्प विदर्भात ते नेऊ शकतात किंबहूना त्यांनी ठरवले तर ते मुंबईचा समुद्र देखील विदर्भात नेऊ शकतात. त्यामुळे अलीकडे स्टंटबाजीत रजनीकांतही मोदींना घाबरतो, अशा शब्दात मोदींची खिल्ली उडवली.

 

वनगा कुटुंबीयांची इच्छा असेल तर तिकीटही देऊ 
दिवंगत खासदार चिंतामण वनगांनी संपूर्ण अायुष्य संघासाठी, हिंदुत्वासाठी वेचले अाहे. दुर्दैवाने त्यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष हाेत अाहे. त्यामुळे या परिवाराच्या भावना अाणि इच्छांचा अाम्ही अादर राखू. पालघर पाेटनिवडणुकीत त्यांनी तिकीट मागितले तरीही अाम्ही त्यांच्या मागणीचा अादर राखू.

 
भुजबळांबाबत बाेलणे टाळले 
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनावरील सुटकेवर बाेलणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. जे झाले अाहे ते जनतेला माहीत अाहे. त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. 

बातम्या आणखी आहेत...