आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघातही शिवसेना देणार उमेदवार : उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या शिवसैनिकांनी एकजुटीने दिलेल्या योगदानामुळेच स्वबळावर विजयात रूपांतर करून आणल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यापुढे इतरांचा विचार न करता आपण स्वबळावर निवडणुका लढविणार असून, त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शिक्षक मतदारसंघासाठी पक्ष उमेदवार देणार   असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, किशाेर दराडे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली अाहे. 


विधानपरिषदेेवर दराडे यांच्या विजयानंतर आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी दराडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे, भाऊ चौधरी, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सचिन मराठे, महेश बिडवे, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, उदय सांगळे, संभाजी पवार, किशोर दराडे, डॉ. सुधीर जाधव, दत्तात्रय वैद्य, वाल्मीक गोरे, कुणाल दराडे उपस्थित होते. विजयाचा आनंद व्यक्त करतांना एकजुटीने निवडणुकांना सामोरे जा, सेनेने ताकद दाखवायला राज्यात सुरुवात केल्याचेही ठाकरे म्हणाले. 


उद्यापर्यत निर्णय हाेण्याची शक्यता 
शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठीची शिवसेनाही रिंगणात उतरणार असल्याचे संकेत पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, याबाबत उद्यापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत ठाकरे यांनी मोजक्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकच्या जागेसाठी अामदार दराडे यांचे बंधू किशोर दराडे इच्छुक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...