आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत गंगापूर धरणात वाढले सहा टक्के पाणी; पाणीसाठा ४२ टक्के

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन दिवसांपासून जिल्ह्यातील त्र्यंबक, इगतपुरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जाेर धरल्यामुळे आता चार दिवसांतच गंगापूर धरणातील ३६ टक्के असलेल्या पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ होत ताे ४२ टक्के झाला आहे. गंगापूर धरणसमूहाचाही पाणीसाठा २५ टक्क्यांवरून ३१ टक्के झाल्याने पाणीसाठा सातत्याने वाढत अाहे. त्यामुळे नाशिककरांना माेठा दिलासा मिळत आहे. 


जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पूर्व भागात हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर ओढ देत पुन्हा जुलैमध्ये आगमन केले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने आता नाशिककरांची चिंता काहीशी दूर होत आहे. बुधवारी नाशिक तालुक्यात सकाळी ८ ते ५ या दरम्यान २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर इगतपुरीत ४७ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १५.६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे. 


गंगापूर धरणात यंदा गेल्या चार वर्षांतील सर्वात नीचांकी साठा उपलब्ध असून वरुणराजाच्या मेहेरबानीमुळे त्यात हळूहळू वाढ होत आहे. सध्या धरणात २३९० दशलक्ष घनफूट म्हणजे ४२ टक्के पाणी आहे. गतवर्षी याचवेळी २४३६ दशलक्ष घनफूट म्हणजे ४३ टक्के पाणी होते. म्हणजे अाजच्यापेक्षा अवघा एक टक्का पाणी कमी होते. त्याचबरोबर समूहातील काश्यपी, गौतमी आणि आळंदी या धरणांत मिळून गेल्या चार दिवसांत सहा टक्के पाणी वाढले आहे. 

बातम्या आणखी आहेत...