आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये फाशी की जन्मठेप? आज होणार फैसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आंतरजातीय प्रेमसंबंधांतून तीन तरुणांची निर्घृण हत्या केल्याबद्दल दोषी धरण्यात आलेल्या सोनई येथील दरंदले परिवारासह ६ जणांच्या शिक्षेची गुरुवारी नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील या हत्याकांडाच्या खटल्यात विशेष सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी एकाच कुटुंबातील पाच जण व त्यांचा एक साथीदार अशा सहा जणांनी कटकारस्थान करून संगनमताने तिघांची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवले. त्यांना फाशी होणार की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.  

बातम्या आणखी आहेत...