आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली चिंता, म्हणाली- मला बाॅडीगार्ड्सच्या गराड्यातही भिती वाटते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशात लहान मुली व महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चिंता व्यक्त केली आहे. सोनालीने म्हटले आहे की सध्या आठ, दहा, बारा वर्षांच्या मुलींसमवेत ज्या घटना घडत आहेत हे पाहून मला बाॅडीगार्ड्सच्या गराड्यात राहूनसुद्धा भिती वाटते. तिने मुलींपेक्षा मुलांवर जास्त संस्कार करण्याची पालकांची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. 


नाशिकमधील वसंत व्याख्यानमालेचा प्रारंभ सोनालीच्या मुलाखतीने झाला. सध्या देशात व आजुबाजुला होणाऱ्या घटना, घडामोडी आणि महिलांबाबतच्या वातावरणाविषयी तिने चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, देशात सध्याचे वातावरण पाहून मला देखील भिती वाटत आहे तर मग सामान्या मुलींची काय अवस्था होत असेल. आठ दहा वर्षांच्या मुलींसोबत जे होते आहे त्याचा खोलवर जावून विचार व्हायला पाहिजे. 

 

आपण मुलींवर जशी बंधने घालतो तशी मुलांवर घालतो का असाही सवाल सोनालीने यावेळी केला. कुटुंबात अधिक मोकळे वातावरण असेल तर अधिक संवाद साधला जातो. भारतीय कौटुंबिक वातारणात आपण सदैव मुलींना दटावत असतो. त्याऐवजी मुलांवर संस्कार करणे जास्त गरजेचे आहे. असेही सोनालीने यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...