आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात प्रथम गणेश सावरकरांनी केला होता \'हिंदूराष्ट्रा\'चा उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे सेनानी होते. १३ जून १८७९ ला नाशिकजवळील भागपूर येथे त्यांच्या जन्म झाला. भारतीय स्वतंत्र्य संग्रामातील ते एक महत्वाचे सैनिक होते. स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ते मोठे बंधू होते आणि बाबाराव सावरकर या नावाने ते सर्वत्र परिचित होते. आज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना देत आहे बाबारावांविषयीची खास माहिती....

 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आप-आपाल्या पतळीवर स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते. यात प्रामुख्याने जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी असे दोन गट होते. महात्मा गांधीं यांच्या शांततेच्या मार्गाने स्वतंत्र्य लढ्यात उतरलेल्यांचा मवाळ मतवादी गट होता. तर, सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या गटाला जहालमतवादी म्हटले जात होते. गणेश दामोदर सावरकर हे याच गटाचा भाग होते. 

 

बाबारावांचे शिक्षण नाशिक येथूनच झाले. सुरूवातीला त्याची रुची धर्म, योग, जप, तप आदि विषयांमध्ये होती. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी वाल्टर चार्ल्स रॅँण्ड प्लेग समिति प्रमुख होता, तेव्हा त्याने भारतीयांवर खूप अत्याचार केले. त्याच्या त्रासाला कंटाळून चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ पोजी रॅँण्डची गोळी झाडून हत्या केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. परंतु, बाबारावांवर याचा काहीही प्रभाव पडला नाही. एकदा तर ते सन्यास घेण्याचा विचार करत होते. परंतु, प्लेगमुळे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर लहान भावांच्या पालन-पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.


महाराष्ट्रात त्यावेळी 'अभिनव भारत' नावाची क्रांतिकारी संघटना काम करत होती. विनायक सावरकर या दलाशी संबंधित होते. ते जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांचे कार्य बाबारावांनी आपल्या हाती घेतले. ते विनायक सावरकर यांच्या देशभक्तीच्या रचना आणि त्यांनी इंग्लंड येथून पठवलेल्या साहित्याचे मुद्रण करायचे आणि त्याचे वितरण करून 'अभिनव भारत'साठी धन जमवत होते. हे कार्य सरकारच्या डोळ्यातून लपले नाही. १९०९ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चावलण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून अंदमानातील तुरूंगात पाठवण्यात आले. १९२७ मध्ये त्यांना तेथून परत भारतात आणण्यात आले आणि एक वर्ष साबरमतीच्या जेलमध्ये कैद करून १९२२ मध्ये सुटका करण्यात आली. त्यानंतर बाबाराव डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले आणि ते आर.एस.एस.चे प्रचार कार्य सुरू केले. बाबारावांनी अनेक पुस्तके देखील लिहिली. 'दुर्गानंदचे छद्म' नावाचे त्यांचे पुस्तक ‘इंडिया इज अ नेशन’ सरकारने जब्त केले होते. ते हिन्दू राष्ट्र आणि हिन्दीचे समर्थक होते. १९४५ मध्ये त्यांचे निधन झाले.


आपले बंधू विनायक सावरकर यांच्यासोबतच बाबारावांना देखील हिंदू राष्ट्रवादाच्या पायाभरणीचे श्रेय जाते. विनायक सावरकर यांच्याबोत मिळून त्यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली. बाबारावांनी राष्ट्रमिमांसा लिहिली होती, असे देखील म्हटले जाते. त्यात त्यांना सर्वात प्रथम भारताला 'हिंदूराष्ट्र' म्हणून प्रस्थापित करण्याचा उल्लेख केला होता. बाबारावांनी १९२२ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत मिळून हिंदू महासभेचा पाया रचला.

 

बातम्या आणखी आहेत...