आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाषाढी एकादशीपासून पुन्हा संप, एसटी कर्मचाऱ्यांनी दिले संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- परिवहनमंत्र्यांनी केलेली वेतनवाढ एकतर्फी असल्याचा निषेध व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संघटनेच्या पाठिंब्याविना संप पुकारला अाणि एसटीला तब्बल १८ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्या पार्श्वभूमीवर सरकारने संपात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या असंतोषात आणखी भर पडली आहे. 


त्यातच वेतनवाढीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप काहीही कार्यवाही सुरु न झाल्यामुळे प्रशासनाबरोबरच संघटनेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून आषाढी एकादशीस अथवा त्यानंतर एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संपाचे शस्त्र उपसले जाण्याचे संकेत मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...