आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’साठी राज्‍य सरकार करणार सक्तीने भूसंपादन; अंतिम प्रस्ताव महामंडळाकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नागपूर-मुंबई समृद्धी कॉरिडॉरसाठी सिन्नरमधील १५८ हेक्टर, कोपरगावमधील ४५ हेक्टर, तर इंगतपुरीतील 'पेसा' हद्दीच्या बाहेरील १० हेक्टर अशा २१३ हेक्टर क्षेत्रास थेट खरेदीने संपादनास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता शासनाने महामार्ग जमीन संपादनाच्या १९५५ च्या सक्तीने भूसंपादन कायद्यानुसार जमीन संपादनास सुरुवात केली आहे. त्याचा अंतिम प्रस्ताव प्रांताधिकारी आणि समृद्धीचे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास सादर करण्यात आला आहे. वर्ग-१ च्या जमिनीनंतर लवकरच पेसा क्षेत्रातील जमिनींचाही प्रस्ताव दिला जाणार असल्याचे समृद्धीचे समन्वयक उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले. 


नागपूर -मुंबई समृद्धी कॉरिडॉरचे ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी एप्रिलमध्येच संपूर्ण जमीन संपादित होणे अपेक्षित होते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढील महिनाभरात अर्थात जूनपासून होणे अपेक्षित असतानाही जमीन संपादनाचेच काम सुरू आहे. नाशिकमध्ये तर जवळपास ११४ गटांतील २१३ हेक्टर जमिनींचे संपादन करणे बाकी आहे. त्यामुळे वेळेत प्रकल्प सुरू होण्याबाबतही साशंकता निर्माण होत आहे. परिणामी एमएसआरडीसीनेही सक्तीने भूसंपादनास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्राथमिक अधिसूचना जाहीर करून तक्रारदारांचे दावे, हरकती घेत त्यांची सुनावणीही झाली. त्याचा प्रस्ताव शासनास प्रांताधिकाऱ्यांनी सादरही केला. आता अंतिम अधिसूचनेचाही प्रस्ताव सादर केला आहे. लागलीच शासनाकडून आता त्याची अधिसूचनाही तत्काळ जाहीर केली जाणार असून त्यापूर्वीच जर शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दिली तरीही त्यांना थेट खरेदीच्या दरानुसारच मोबदला दिला जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यात सिन्नर तालुक्यात २५ गावांत ४०३ गटांमधील १३६.५९ हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन होणार आहे, तर इंटरचंेजासाठी गोंदे येथील २६ गटांतील २२.९१ हेक्टर जमीन संपादन होईल. 


 

तालुकानिहाय क्षेत्र -   
* सिन्नर तालुक्यातील २५ गावांमध्ये खरेदीने जमीन संपादनास अडचण आहे. त्यातील जवळपास ४०३ गटांमधील १३६.५९ हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन होणार आहे, तर महामार्गावरून इंटरचेंज करण्यासाठी गोंदे येथील २६ गटांतील २२.९१ हेक्टर जमीन सक्तीने संपादन केली जाईल.    
* इगतपुरीतील ‘पेसा’ क्षेत्र वगळून इतर वर्ग -१ च्या जमिनींपैकी २७ गटांतील शेतकऱ्यांमध्येच वाद आहे. त्यामुळे १०.५६ हेक्टर क्षेत्र संपादित झाले नसून ते सक्तीने संपादित केले जाईल.    
* कोपरगावमधील १० गावांतील ५८ गटांमधील ४५.२३ हेक्टर जमीन सक्तीने संपादित केली जाईल.    

 

 

बातम्या आणखी आहेत...