आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूकदारांच्या संपामुळे एका दिवसात ६० लाखांच्या कांद्याची वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असून डिझेलचे भाव ७२ रुपये ५० पैशांपर्यंत गेल्याने लासलगाव येथील मालवाहतूकदार संघटनेकडून सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. वाहतुकादारांच्या या लाक्षणिक संपामुळे लासलगावमधून फक्त एकाच दिवसात साेमवारी ५० ते ६० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. अशीच   इंधन दरवाढीची परिस्थिती कायम राहिली तर ट्रकचा बेमुदत संपाचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे. 


आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अाहे. लासलगाव बाजार समितीत दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदे व तीन ते चार हजार क्विंटल धान्याची आवक होत असते. येथे खरेदी झालेला शेतीमाल ट्रक व इतर वाहनांच्या सहाय्याने बाहेरगावी, रेल्वेपर्यंत अथवा जहाजापर्यंत पाठविला जाताे. गेल्या अनेक दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये इंधन दरवाढीमुळे नाराजीचा सूर पहायला मिळत अाहे. या इंधन दरवाढीचा फटका मालवाहतुकीवरही होऊ लागला आहे. मालवाहतुकीचे दर पर्यायाने वाढविले जात आहेत. दररोज रात्री इंधनाच्या दरात थोडी वाढ होत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. 


लासलगाव शहरात मालवाहतूकदार संघटना कार्यरत असून, या संघटनेमध्ये २०० ट्रकचा समावेश आहे. सोमवारी इंधन दरवाढीला कंटाळलेल्या मालवाहतूकदारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून सरकारला 'आतातरी इंधनाचे दर कमी करा' असा इशारा यानिमित्ताने दिला. 


लासलगाव शहरातील रेल्वे स्टेशनरोड परिसरात सुमारे २०० ट्रक इंधन दरवाढीला कंटाळून साेमवारी उभे करण्यात अाले हाेते. यामुळे शहरातून बाहेर जाणारा कच्चा माल व कांदा माेठ्या प्रमाणात पडून होता. एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये बाळासाहेब होळकर, दीपक खांदे, महेश होळकर, दत्तात्रय ठाकरे, सागर पवार, सलीम शेख, गोरख सोनवणे, दत्तू जाधव, इस्माईल शेख, संजय होळकर, सचिन गायकवाड, सुफियान शेख, शरद कोटकर, सोमनाथ विंचू, बापू शिंदे, कैलास काळे, बंटी होळकर, मारुती हरळे यांच्यासह अनेक मालवाहतूकदारांनी सहभागी होत दरवाढीचा निषेध केला. अांदाेलनास शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला. 


सर्वाधिक फटका कांदा दरास बसणार 
लासलगाव बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. दररोज २० ते २२ हजार क्विंटल कांदा लासलगाव येथे परिसरातील शेतकरी विक्रीसाठी अाणतात. केंदअ सरकार इंधनाचे वाढवत असल्यामुळे एक दिवसाचा लाक्षणिक संप मालवाहतूकदारांनी केल्याने सुमारे ५० लाख रुपयांचा कांदा बाहेरगावी जाऊ शकला नाही. त्यातच इंधनाचे भाव असेच वाढत राहिले तर बेमुदत संपाचा इशारा ल ासलागव येथील मालवाहतूकदार संघटनेने दिल्याने कांद्याला या इंधन दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


इंधनाचे दर कमी करावे 
दरराेज इंधन दरवाढीचा सामना करावा लागताेय. याला कंटाळून आम्ही लाक्षणिक संप केला. मात्र, शासनाने यात लक्ष घालून इंधनाचे दर तातडीने कमी करावेत. अन्यथा आम्ही ट्रकचा बेमुदत बंद पाळणार आहोत. 
- बाळासाहेब होळकर, मालवाहतूकदार संघटना सदस्य, लासगाव 

बातम्या आणखी आहेत...