आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : अादिवासी विकास घाेटाळ्यातील दहा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आदिवासी विकास घोटाळ्यात दोषी १० अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करंदीकर समितीने शासनास केली आहे. सन २००४ ते २००९ या काळात आदिवासी विकास विभागातील कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  


या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी घेऊन पोपट बहिरम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशाने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी पाच खंडांचा अहवाल सादर केला. याची व्याप्ती मोठी असल्याने त्यांच्या कार्यवाहीसाठी सेवानिवृत्त अधिकारी पी. डी. करंदीकर समिती नेमली हाेती.


यांच्याविराेधात गुन्ह्यांची शिफारस 
एस एस सांबरे, प्रादेशिक व्यवस्थापक, नंदुरबार, जी आर कोलटवार, प्रादेशिक व्यवस्थापक, धारणी,  व्ही एस गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली, ए. डी. राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक, नाशिक, एस. आर. गायकवाड, उपप्रादेशिक 
व्यवस्थापक, जुन्नर, डी एस चौधरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार, एस. एस. बावणे, व्यवस्थापक, यवतमाळ, ए. एस. मुळेवार, व्यवस्थापक, चंद्रपूर, टी एन वाघ, व्यवस्थापक, देवरी, एस. एस. मुळेवार, व्यवस्थापक, अहेरी.

 

बातम्या आणखी आहेत...