आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन दिवसांच्या बाळावर नाशकातील डॉक्टरांची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अवघ्या दोन दिवसांच्या बालकावर नाशिकमध्ये यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडली आहे. अवघ्या अडीच किलाे वजनाच्या बालकाच्या हृदयाच्या झडपेला असलेला अडथळा बलून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दूर करण्यात त्यांना यश अाले.  


नाशकातील खासगी रुग्णालयात सुखरूप प्रसूत झालेल्या महिलेच्या नवजात बाळाला दूध पिताना त्रास हाेऊ लागला हाेता. तपासणीअंती बालराेगतज्ज्ञ डाॅ. नितीन मेहकरकर व डाॅ. प्रफुल्ल पटेल यांनी या बाळाला हृदयाचा अाजार असल्याचे सांगितले. बाळास तातडीने डाॅ. लवणकर यांच्याकडे दाखल केले.  हृदयाच्या डाव्या कप्प्यातून निघणाऱ्या रक्तवाहिनीच्या झडपेस अडथळा येत हाेता. हृदयाच्या डाव्या कप्प्यातून रक्त शरीरभर पाेहोचू शकत नसल्याने बाळ अत्यवस्थ झाले हाेते. त्याच्यावर अावश्यक उपचारांची माहिती बाळाच्या अाई-वडिलांना देण्यात अाली. त्यांच्या संमतीनुसार तातडीने शस्त्रक्रियेसाठी तयारी करण्यात अाली अाहे. भूलराेगतज्ज्ञ डाॅ. भूपेश पराते यांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात अाली. शस्त्रक्रियेनंतर  डाॅ. दीपाली ततार व डाॅ. सागर भालेराव यांनी काळजी घेतली. नंतर पाचच दिवसांत बालकाला सुखरूपपणे घरी साेडण्यात अाले.  


उत्तर महाराष्ट्रातील पहिली शस्त्रक्रिया   
मांडीच्या रक्तवाहिनीद्वारे हृदयापर्यंत पाेहोचून बलूनच्या साहाय्याने या बाळाच्या हृदयाच्या झडपेस असलेला अडथळा दूर करण्यात अाला.  अतिशय जिकिरीच्या शस्त्रक्रियेत काेणत्याही क्षणास मांडीच्या रक्तवाहिनीस इजा हाेण्याची अथवा हृदय बंद हाेऊन गंुतागुंत निर्माण हाेण्याची शक्यता लक्षात घेता विनाटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात अाली. उत्तर महाराष्ट्रातील बालकांवर अशा प्रकारची ‘अाेपन हार्ट’  सर्जरी टाळून केली गेलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली, अशी प्रतिक्रिया बालहृदयराेगतज्ज्ञ डाॅ. ललित लवणकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...