आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांची सद‌्सदविवेकबुद्धी त्यावेळी कुठे गेली होती? बाळासाहेबांच्या फाइलवरून मुनगंटीवारांचा टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या आदेशाची फाइल ही युती सरकारच्या कालावधीतच तयार झाली. मी मंत्री असताना त्यावर फक्त सहीच केली असा खुलासा छगन भुजबळ यांनी करत त्याचे खापर युती सरकारवर फोडल्यानंतर राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भुजबळांवर पलटवार करताना म्हणाले की, फक्त सही करणे म्हणजे काय? प्रत्येक मंत्र्याने स्वाक्षरी केल्यानंतर आदेश आणि निर्णय अंतिम होतात. त्यामुळे फाइलवर सही करताना भुजबळांची सदसदविवेकबुद्धी कुठे गेली होती? त्यांनी तिचा वापर करायलाच हवा होता. पावसाळ्यात १३ कोटी वृक्षलागवडीसंदर्भातील विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मुनगंटीवारांनी भुजबळांवर तोंडसुख घेतले.


कुठल्याही खात्याची फाइल तयार झाल्यानंतर संबंधित मंत्र्याने त्या फाइलवर सही केल्यानंतर निर्णय अंतिम होतात. त्यामुळे मंत्र्याने स्वाक्षरी करत असलेल्या फाइलवर आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करणे अपेक्षित असते. सही झाली म्हणजेच आदेश निर्गमित झाले असा सरळ त्याचा अर्थ होतो. त्यामुळे युती सरकारच्या काळात अशी कुठलीही फाइल तयार होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण, जर भुजबळांच्या म्हणण्यानुासर त्यांनी त्या फाइलवर केवळ सहीच केली असे असेल, तर मग त्यांनी सद्सदविवेकबुद्धीचा वापर का नाही केला. कुठलाही मंत्री, अधिकारी फाइलवर सही करतो, तर तो डोळे झाकून करतो का? किंबहुना तो असे म्हणू शकत नाही. तसे म्हणण्याचा त्याला अधिकारही नाही. आपण जेव्हा राज्यपालांच्या साक्षीने शपथ घेतो, तेव्हा राज्याचे हित करण्यासाठी आपल्या सहीचा वापर करत असल्याची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे मी फक्त सही केली असे म्हणून कोणालाही बाजूला जाता येणार नाही. असे स्पष्ट करत त्यांनी भुजबळांना टोला लागवला.

बातम्या आणखी आहेत...