आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार सुरू असलेल्या मनोरुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरू असलेल्या तरुणाने राहत्या घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अमोल रमेश कर्पे (२७, रा. माळेगाव, मूळ पिंपळगाव घाडगा ता. इगतपुरी) असे या तरुणाचे नाव आहे. 


रमेश कर्पे एका खासगी कंपनीत नोकरीस अाहेत. माळेगाव येथील केरू घुगे यांच्या चाळीत कुटुंबीयांसह भाडेतत्त्वावर रहात हाेते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मनोरुग्ण मुलगा अमोलवर नाशिक येथील एका मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता. सोमवारी दुपारी त्याचे वडील रमेश कर्पे घराशेजारील मंदिराच्या ओट्यावर बसले होते. याचबराेबर त्याची आई बाहेर कामासाठी गेली होती. घरात एकटे असल्याची संधी साधून अमोलने घराच्या छताला साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. 


वडील रमेश कर्पे घरात आले असता हा प्रकार निदर्शनास आला. यासंदर्भात मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अाकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे हवालदार राम भवर, लक्ष्मण बदादे तपास करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...