आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेखाली अाल्याने शरीराचे दाेन तुकडे,तरीही काही सेकंद जिवंत;पाेलिसांना नाव सांगून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजयच्या शरीराचे दोन तुकडे झाले. - Divya Marathi
संजयच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

नंदुरबार- नंदुरबार रेल्वेस्थानकावर मालगाडीच्या डब्याखाली एकाने आत्महत्या केली. त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर काही सेकंद ताे जिवंत हाेता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना त्याने स्वत:चा पत्ता व नाव सांगितले अाणि नंतर प्राण साेडला.  


नंदुरबार रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एक व दोनच्या मधल्या  रुळावरून सोमवारी सकाळी ११.३० मालगाडी निघाली. गाडीचा वेग कमी होता. अचानक ३९  वर्षीय संजय मराठे याने  रेल्वेखाली स्वत:ला झाेकून दिले. त्यात त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. गाडी रेल्वे रुळावरून पास झाल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड केली. स्थानकावर कार्यरत असलेल्या सहायक फाैजदार गोविंद काळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल खिरटकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी  संजयचा देह पालथा पडला होता. त्याला पाेलिसांनी संजय सोनवणे या मदतनिसाच्या साहाय्याने उचलले. तोपर्यंत त्यांच्या शरीरात प्राण होते. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या वडिलांचे नाव नामदेव मराठे आहे. मी लहान माळीवाड्यात राहतो.’ इतके बाेलणे झाल्यावर त्याने मान टाकली. तोपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तसेच संजयचे वडील नामदेव मराठे घटनास्थळी अाले. त्यांनी ते दाेन तुकडे एकत्र करून रुग्णवाहिकेत टाकले व जिल्हा रुग्णालयात नेले. फोरेन्सिक तज्ज्ञ डॉ. रोहन थोरात यांनी  तपासणी करून प्राण आधीच निघून गेल्याचे सांगितले. संजयचे वडील रेल्वेतून पोर्टर म्हणून निवृत्त झाले आहेत.   

 

संजय हा मानसिक रुग्ण   
संजय हा मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर डॉ. कौशिक गुप्ते यांच्याकडून उपचार सुरू होते. दोन दिवसापूर्वीच त्याची औषधी संपली. मंगळवारी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणार हाेते. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार अाहे.  संजयचा भाऊ मनोज याचे २२ जून २०१७ रोजी निधन झाले अाहे.    

 

मेंदूत रक्तपुरवठा हाेईपर्यंत प्राण असताे   
माणसाच्या शरीरात पायापासून मेंदूपर्यंत रक्तपुरवठा हाेत असताे. शरीराचे दाेन तुकडे झाल्यानंतरही रक्तपुरवठा व अाॅक्सिजनचा पुरवठा मेंदूत असेपर्यंत व्यक्ती जिवंत असताे. परंतु हा कालावधी तीन-चार मिनिटांपेक्षा जास्त असू शकत नाही.   
- डाॅ.भास्करराव खैरे, अधिष्ठाता, जळगाव वैद्यकीय महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...