आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या हातावर तुरी देत 'स्वाभिमानी'चे दूध अांदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड / इगतपुरी- दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा खंडीत करण्यासाठी राज्यभरात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी कसारा घाटात पोलिस संरक्षणामध्ये जाणारा दुधाचा टंँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अडविण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत टँकर पुढे मुंबईकडे रवाना केला. 


दुधाला सरकारने घोषित केलेला २७ रुपये प्रति लिटर हा दर मिळत नसून दूध संघ १७ रुपये प्रति लिटर दर शेतकऱ्यांना देतात. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी १६ जुलैपासून दुधाला ५ रुपये अनुदान देण्यासाठी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...