आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तपमान 9 अंशांवर, थंडीच्या कडाक्यात वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढल्याने शहरवासियांच्या हुडहुडीतही वाढ झाली अाहे. रविवारी किमान तपमान ९.५ तर कमाल तपमान ३१ अंश सेल्सिअस असे नाेंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.४ अंश सेल्सियसची नोंद झाली.

 

डिसेंबरअखेरीस तपमानात घसरण होत असल्याने शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांचा दिनक्रमात बदल झाला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने थंडीमध्ये वाढ झाली आहे. ओखी चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला होता. त्यामुळे ढगाळ वातावरणाने तपमानात वाढ झाली होती. आता पुन्हा आकाश निरभ्र झाल्याने किमान तपमानात घसरण झाली असून किमान तपमान ९.५ तर कमाल तपमान ३१ अंशांपर्यंत गेले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...