आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा देण्यापूर्वी नार्काे चाचणी करा, मगच मुलास फाशी द्यावी;अाराेपीच्या अाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोनई हत्याकांडाच्या खटल्यातील आरोपी क्रमांक ४ असलेल्या अशोक नवगिरेच्या कुटुंबाने न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांची भेट घेऊन मुलाच्या नार्को चाचणीची मागणी केली आहे. आपला मुलगा त्या दिवशी तुकाराम शेंडे यांच्याकडे कामास हाेता. त्यामुळे या खटल्यात इतर ५३ साक्षीदारांसोबत शेंडेची साक्ष का घेतली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर सोनई पोलिसांनी आपल्या मुलाला यात गोवले असून, न्यायालयाने शिक्षा सुनावण्यापूर्वी आपल्या विनंतीचा विचार करावा, अन्यथा मी २० जानेवारीस मी कुटुंबासह कोर्टाच्या आवारात आत्मदहन करीन, अशा इशारा अाराेपी अशाेकच्या अाई मालन नवगिरे दिला अाहे.  


आरोपी संदीप कुऱ्हेच्या सांगण्यानुसार अशोक नवगिरेने संदीप थनवार, सचिन घारू आणि राहुल कंडारे या तीन सफाई कर्मचाऱ्यांना दरंदले वस्तीवर बोलावून आणले आणि अशोक नवगिरेने त्या प्रेमप्रकरणाची माहिती दरंदलेंना दिली, असे खोटे आरोपपत्र पोलिसांनी तयार केल्याचे मालन यांचे म्हणणे आहे. माझा मुलगा १ जानेवारी २०१३ रोजी तुकाराम शेंडे यांच्याकडे कामाला होता, त्यांचा जबाब घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोपी अशोक नवगिरेनेही याबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याचे शिक्षेच्या युक्तिवादादरम्यान न्यायालयापुढे सांगितले आणि आपण कारागृहात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...