आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TET परीक्षा आता होणार 15 जुलैला, ‘नेट’च्या परीक्षार्थींना मिळाला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सीबीएसईतर्फे ८ जुलै रोजी देशभरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, याच दिवशी राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा घेण्याचे नियोजन होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षार्थी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता परीक्षा परिषदेने त्याची दखल घेत टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा ८ एेवजी १५ जुलै रोजी घेतली जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अखिल भारतीय स्तरावर नेट परीक्षा घेतली जाते. नेट परीक्षेची तारीख पूर्वीच जाहीर करण्यात आली होती. 


या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्जही केले आहेत. ८ जुलै ही नेट परीक्षेची तारीख माहिती असताना राज्य परीक्षा परिषदेनेही ८ जुलै रोजीच टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे, नेट आणि टीईटी या दोन्ही परीक्षा देणारे बहुसंख्य परीक्षार्थी एकच असतात. त्यामुळे अडचण झाली होती.

 

टीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
१५ जुलै रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत असलेली मुदत आता २२ मे करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...