आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास 'आयएसओ'; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी अधीक्षकांचा गाैरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शेतकऱ्यांसाठी सतत पारदर्शी आणि सुप्रशासन असल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही ही बाब ओळखून शासनाने कामे वेळेवर, मुदतीमध्ये होण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा असूनही प्रत्यक्ष कामे मार्गी लावण्यासाठी सुयोग्य प्रशासन आणि सुनिश्चित प्रशासकीय पद्धतीची नितांत गरज असते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने गत वर्षभर मेहनत घेत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांचे समाधान करून त्यांना योजना मिळवून देण्यासाठी मदत तसेच पर्यावरणपूरक इमारत तयार करून कृषी अधीक्षक कार्यालय राज्यात पहिलेच आयएसओ ९००१ चे मानांकित ठरले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांना गौरविण्यात आले. 


पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नवत असलेले डिजिटल इंडिया, संगणकीकृत कार्यालय, आलेल्या शेतकऱ्यांचे झालेले समाधान, तसेच मुदतीत झालेली कामांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप यांनी दोन वर्षांपासून मेहनत घेतली आहे. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आलेल्या शेतकऱ्यांसोबत बोलण्यापासून त्यांना मार्गदर्शन करण्यापर्यंत सर्व बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर प्रत्यक्ष अमलात आणल्या. शेतकऱ्यांना समाधानकारक अनुभव आला. त्यासाठी आॅडिटर तपासणी करण्यात आली. कृषी अधीक्षक कार्यालयाची आयएसओ ९००१ नामांकनासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे कृषी विभागातील नाशिकचे कार्यालय राज्यात पहिलेच आयएसओ कार्यालय ठरले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते कृषी अधीक्षक तुकाराम जगताप आणि विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे यांना नामांकन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देणार 
नियमानुसार शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. शेतकऱ्यांचे समाधान होण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित ठेवण्यात येणार आहे. 
- तुकाराम जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...