आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदी केअर' याेजनेचा उगम महाराष्ट्राच्या जीवनदायीतून; फुले जनआरोग्य योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशातील १० कोटी कुटुंबांना आरोग्य विम्याचे कवच देणाऱ्या  आयुष्मान जन विमा योजनेचा  उगम महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी (आता महात्मा फुले असे नामकरण) योजनेत  आहे. सरकारतर्फे राबवण्यात येणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असा दावा केंद्र सरकार करत असले तरी याच धर्तीची महात्मा फुले जनआरोग्य सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर योजनेला मोदी केअर म्हणून संबोधन मिळाले आहे.   


अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना कशी राबवणार याचा तपशील नाही. राष्ट्रीय स्तरावर ही योजना राबवण्यासाठी सुमारे २०० लाख कोटी रुपये लागतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सरकारने मात्र तूर्तास यासाठी केवळ २००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात यासाठी १००० कोटींची तरतूद आहे. या योजनेसाठी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून सविस्तर मांडणी करण्यात आली असून येत्या सहा महिन्यांत सर्व काही स्पष्ट होईल. आरोग्य विमा रकमेत ६० टक्के वाटा केंद्राचा तर ४० टक्के वाटा राज्याचा राहील, असे वित्त सचिवांनी स्पष्ट केले आहे. 


या योजनेत आता खासगी कंपन्याही उतरण्याची शक्यता अाहे. अर्थसंकल्पातील तरतूद पाहता १५ हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसने राजीव गांधी यांच्या नावाने सर्वप्रथम आरोग्य योजना सुरू केली. नंतर आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडूत अशाच योजना सुरू आहेत.


जीवनदायी  आयुष्मान जन विमा
१. असे आहे विमा कवच

- राजीव गांधी जीवनदायी योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षासाठी १.५० लाखाचे विमा संरक्षण होते.   
- आयुष्मान जन विमा योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षासाठी ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे.      


२. विमा संरक्षणाची व्याप्ती
- गुंतागुंतीच्या म्हणजे टर्शिअरी सर्जरीज कव्हर. उदा :  बायपास, न्यूरो सर्जरी, अॅन्जिओप्लास्टी
- टर्शिअरीसोबत नेहमीच्या सेकंडरी सर्जरीजही कव्हर हाेतील. उदा.: फ्रॅक्चर्स, गर्भाशय, अपेंडिक्स सर्जरी.


३. योजनेसाठी निधी वाटप
- या योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्राचा निधी ८०० ते १००० कोटींचा होता.   
- देशासाठी २००० कोटी, म्हणजे सध्या प्रति व्यक्ती ४० रुपये आहे.  


 ४. योजनेतील कुटुंबांचे लक्ष्य
- या योजनेसाठी कुटुंबांचे विशिष्ट असे लक्ष्य निर्धारित केलेले नाही.
- यात वर्षाला १० कोटी कुटुंबे म्हणजे ५० कोटी लाभार्थींचे लक्ष्य आहे.


५. लाभार्थी निकष असे
- या राजीव गांधी जीवनदायी योजना पिवळे आणि केशरी रेशनकार्ड-धारकांसाठी होती.
- निकष अद्याप स्पष्ट नाहीत, परंतु ती गरीब  कुटुंबांसाठी असेल असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...