आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालेगाव- धर्मांविषयी पसरवले जाणारे गैरसमज जातीय तणावास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. गैरसमज संपले तर तणावही संपुष्टात येईल. परंतु, यासाठी प्रत्येक धर्म समजून घेणे गरजेचे अाहे. इस्लाम धर्माबद्दलचे गैरसमज दूर व्हावे या हेतूने जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेने काही हिंदू बांधवांना मशिदीत अामंत्रित करून इस्लाम धर्माचे अाचरण, शिकवण याबाबत माहिती दिली.
मालेगाव शहर जातीय दंगलींच्या इतिहासाने परिचित अाहे. धर्म-जातीविषयी अपप्रचार, गैरसमज निर्माण करून दरी निर्माण केली जाते. ही बाब अाेळखून जमात-ए-इस्लामी हिंदच्या मालेगाव शाखेतर्फे रजापुरातील महेबूब मशिदीत हिंदू बांधवांना निमंत्रित केले हाेते. मशिदीत काय हाेते, नमाज कशी अदा केली जाते. धर्मगुरू काय प्रवचन करतात, मेहराब काय असताे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हिंदू बांधवांनी जाणून घेतली. मुस्लिम बांधवांनी मशीद परिचय उपक्रम अायाेजित करून पुढे टाकलेले पाऊल देशाची एकता, शांती अबाधित ठेवण्यासह इस्लामची शिकवण मानवतेवर अाधारलेली असल्याचा संदेश देणारे ठरले अाहे. त्यावर हिंदू बांधवांनीही भविष्यात मंदिर परिचय उपक्रम राबवून मुस्लिमांना अामंत्रित करत जातीय सलाेखा कायम टिकून राहावा असा संकल्प केला. याप्रसंगी माैलाना फिराेज अाझमी, डाॅ. इब्राहिम खान काटेवाले, संभाजी ब्रिगेडचे अनिल पाटील, जितेंद्र वाघ उपस्थित हाेते. या वेळी एकत्रित जेवणाचा अानंदही घेतला.
विचारांचे अादान-प्रदान व्हायला हवेे
विचार जखडून ठेवल्याने धर्म विशिष्ट लाेकांपुरता मर्यादित राहताे. धर्मातील चांगले अाचरण व विचारांचे अादान-प्रदान हाेत नाही, ताेपर्यंत गैरसमज दूर हाेणार नाहीत. मंदिर परिचय कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांना सहभागी करून घेणार अाहाेत.
- अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड
प्रार्थनास्थळांची निर्मिती संपूर्ण मानवजातीसाठी
भगवंताने मानव जातीसाठी प्रार्थनास्थळाची निर्मिती केली अाहे. मशिदीत मुस्लिमांनाच प्रवेश दिला जाताे असे नाही. अामच्यासाेबत हिंदू बांधवांनी मशिदीत बसून इस्लामचे विचार एेकून घेतले. अाम्हीही मंदिरात जाऊन हिंदू धर्माची शिकवण जाणून घेऊ.
- डाॅ. इब्राहिम खान काटेवाले, जमियत-ए-इस्लामी हिंद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.