आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- हावडा एक्सप्रेसचे तीन डबे रूळावरून घसरले, इगतपुरीनजीकच्या पुलाजवळ अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई- हावडा एक्सप्रेसचे तीन डबे रात्री अडीच वाजेच्या सुमारास इगतपुरीजवळ घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. इगतपुरीनजीकच्या पुलाजवळ हा अपघात झाला. घसलेले डबे रुळावरून काढण्‍यात रेल्‍वे प्रशासनाला सकाळी यश आले आहे.

 

या अपघातामुळे नाशिकहून भुसावळकडे जाणा-या तसेच पंचवटी एक्‍सप्रेस, गोदावरी एक्‍सप्रेस, राज्‍यरानी एक्‍सप्रेस या गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. मुंबईवरून येणाऱ्या गाड्याचे मार्ग कल्याण -पुणे - दौंड असे वळवण्यात आले आहेत. यामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात येणारी जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  काही गाड्या वेगवेळ्या रेल्वे स्‍टेशनवर थांबविण्यात आल्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...