आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावडा मेलचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले, चार तास वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड / इगतपुरी / मनमाड- पावसामुळे सव्वा दोन तास विलंबाने धावणाऱ्या मुंबई- हावडा मेलचे रविवारी (दि. १०) रात्री दोन वाजेच्या सुमारास इगतपुरी स्थानकाजवळ तीन डब्बे रुळावरून घसरले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पंचवटी, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस आणि भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. लांब पल्याच्या १० गाड्यांचा मार्ग अन्यत्र वळवण्यात आला.


या गाड्या रद्द 
राज्यराणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ- मुंबई पॅसेंजर नाशिकरोड पर्यंतच धावली. 


या गाड्यांचा वळविला मार्ग
मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस या मनमाड- दौंडमार्गे वळविण्यात आल्या. मुंबई- वाराणसी एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, पनवेल- गोरखपूर एक्स्प्रेस, हाथिया एक्स्प्रेस वसई- सुरत- जळगावमार्गे वळविण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...