आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगमंत्री देसाईंच्या उपस्थितीत नाशकात अाज बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी (दि. २९) नाशिकच्या दाैऱ्यावर येत अाहेत. सन २०१८ पासून राज्यात येऊ घातलेल्या नव्या अाैद्याेगिक धाेरणाच्या संदर्भात उद्याेजकांशी ते संवाद साधणार अाहेत. उद्याेगांना अपेक्षित असलेल्या बाबी, सध्याच्या २०१३ च्या अाैद्याेगिक धाेरणामध्ये अपेक्षित बदल या अनुषंगाने अनेक मागण्या यावेळी उद्याेजक संघटनांकडून मांडल्या जाणार अाहेत. कुठलेहंी धाेरण अाखण्यापूर्वी त्याशी निगडित घटकांशी अगाेदर चर्चा करण्याची मागणी सातत्याने केली जात हाेती, या सरकारने त्याची दखल घेतल्याचा चांगला संदेशही या देसाई यांनी बाेलाविलेल्या या बैठकीच्या निमित्ताने जाणार अाहे. 


हाॅटेल गेट वे येथे दुपारी ३ वाजता हाेत असलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्वच अाैद्याेगिक संघटनांना निमंत्रित केले अाहे. यात सर्वच संघटनांकडून विविध प्रश्नांबाबत चर्चा उपस्थित केली जाणार असली, तरी गेल्या काही वर्षात अाैद्याेगिक गुंतवणुकीसाठी सातत्याने नाशिकवर अन्याय हाेत असल्याची भावना पहायला मिळते, तिचीही पार्श्वभूमी अाैद्याेगिक धाेरणाच्या अपेक्षांच्या रूपाने समाेर येण्याची शक्यता अाहे. असमान वीजदर, पायाभूत सुविधांचा प्रश्न, वर्षानुवर्षे निर्णय न झाल्याने एमअायडीसीच्या मालकीच्या काेट्यवधींच्या धूळखात पडून असलेल्या मालमत्ता, प्राेत्साहन अनुदान याेजनेत बदल, बंद उद्याेगांकडे अडकून पडलेल्या एमअायडीसीची राज्यभरातील शेकडाे एकर जमीन, यंत्रमाग उद्याेगाचे प्रश्न, नाशिकसारख्या माेठ्या कृषी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात प्रक्रिया उद्याेगांच्या उभारणीसाठी स्वतंत्र धाेरण यांसारख्या विषयांवर या बैठकीत सूचना येण्याची शक्यता अाहे. बैठकीला उद्याेग, ऊर्जा व कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, एमअायडीसीचे सीईअाे संजय सेठी यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. 

बातम्या आणखी आहेत...