आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आरटीई'च्या तीन हजार जागांसाठी आजपासून पुन्हा प्रवेश संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पार पडल्या असून, तीन हजार ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. आरटीईच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली असून, वंचित विद्यार्थ्यांना २६ मे ते ४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता   येईल. 

 


आरटीईच्या तीन हजार १८९ जागांसाठी ४ जूननंतर तिसरी सोडत काढली जाणार असून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकेल. शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव असलेल्या जागांसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया राबवली जात अाहे. नाशिक जिल्ह्यातील ४६६ शाळांमधील ६ हजार ५८९ जागांसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या दोन फेऱ्यांतर्गत ४ हजार ९०३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी ३ हजार ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निम्म्याहून अधिक जागा रिक्त; राहिल्या होत्या. दुसऱ्या फेरीची मुदत संपली असून पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष आता तिसऱ्या सोडतीकडे लागले अाहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज २६ मे ते ४ जून या कालावधीत भरता येईल. यानंतर तिसऱ्या सोडतीची प्रक्रिया पार पडेल. 


एचआयव्ही बाधितांना संधी 
वंचित घटकांमध्ये वि. जा. भटक्या जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागास वर्ग (एसबीसी) तसेच एचआयव्ही बाधित, प्रभावित गटातील मुलांना या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. या मुलांच्या पालकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जातप्रमाणपत्र आवश्यक असेल. एचआयव्हीबाधितांना जिल्हा शल्यचिकित्सक तसेच समकक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. 

बातम्या आणखी आहेत...