आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड ते सिन्नर प्रवास अाता अवघ्या २० मिनिटांमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक-पुणे महामार्गाच्या चाैपदरीकरणात बांधण्यात अालेल्या दारणा नदीवरील नवीन पुलामुळे नाशिकराेड ते सिन्नर हा प्रवास अाता अवघ्या २० मिनिटांत हाेऊ शकणार अाहे. अाधी या प्रवासाला ५० मिनिटे लागत. या पुलामुळे दिवसाकाठी सुमारे ४० हजार वाहनांचा वेळ वाचणार अाहे. सिन्नरसह पुणे, शिर्डी, अहमदनगर, संगमनेरला जाणाऱ्या वाहनांचा प्रवासवेळ किमान अर्ध्या तासाने कमी हाेणार अाहे. पुलावर नेहमीच हाेणारी वाहतूक काेंडी अाणि अपघातांमुळे अनेकदा नाशिकराेडपासून सिन्नरला पाेहाेचायलाच दीड-दाेन तास लागत. नव्या पुलामुळे उत्तम सुविधा उपलब्ध हाेऊन फार माेठा त्रास वाचल्याची समाधानाची भावना वाहनचालक, प्रवासी अाणि मालवाहतूकदार व्यक्त करत अाहेत. 


जुना पूल ब्रिटिशांनी १९२५ मध्ये बांधला होता. दिवसेंदिवस या मार्गावरील वाहतूक वाढत गेल्याने पूल अपुरा पडू लागला अाणि वाहनांची कोंडी नित्याचीच झाली. जुन्या पुलावरून वाहतूक सुरू असताना तेथे वळणाचा रस्ता असल्यामुळे अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आता नव्या पुलामुळे सरळ रस्ता झाल्याने तसेच वाहतूकही वेगवेगळी हाेऊन अपघात कमी झाले आहेत. चेहेडीजवळ उभारलेल्या या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकराेडकडून सिन्नरकडे वाहतूक सुरू असून, सिन्नरकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी पूल सुरू हाेण्यास महिन्याभराचा अवकाश लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


अशी आहे आकडेवारी 
४० हजार वाहनांना फायदा दिवसाला 
३० मिनिटे : पुणे, शिर्डी, अहमदनगर, संगमनेरकडे जाणाऱ्या वाहनांचा वेळ वाचणार 
५० मिनिटे किमान पूर्वी लागत 


वृक्षांची तक्रार दाखल 
चेहडीजवळील वृक्षांची न्यायालयात तक्रार दाखल आहे. त्यामुळे पुलाची एक बाजू बंद ठेवण्यात आली आहे. ही तक्रार निकाली निघेल त्यावेळी पूल पूर्णपणे सुरू करण्यात येणार आहे. सध्या दिवसाकाठी या पुलावरून दुचाकी वगळता सुमारे १५ हजार माेठ्या वाहनांची ये-जा सुरू अाहे. 


लवकरच पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला 
पुलाची एक बाजू सुरू करण्यात आली दुसऱ्या बाजूची वाहतूक वृक्षांमुळे थांबविण्यात आली आहे. ज्यावेळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल आणि वरिष्ठ आदेश देतील तेव्हा दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली होईल. 
- सुनील भोसले, टोल प्रकल्प प्रमुख 


लहानपणापासून आम्ही दारणा पूल पाहत आलो आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक अपघातदेखील झालेले पाहिले. परंतु आता नव्या पुलामुळे अपघातांना आळा बसेल 
- अनिल ढेंरिंगे, ग्रामस्थ, पळसे 

बातम्या आणखी आहेत...