आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये चोरलेली बस नाशिकमध्ये पकडली; चालकास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ मालेगाव- सिडको (अाैरंगाबाद) परिसरात चोरी केलेली ट्रॅव्हल बस महामार्गावर पाठलाग करून पकडण्यात आली. गुरुवारी धुळे मार्गावरील चिखलओहळ परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. चालकास पोलिसांनी अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अधीक्षक संजय दराडे यांनी सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारले आहेत. परजिल्ह्यांतील गुन्हेगार जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने नाकेबंदी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एलसीबीचे पथक महामार्गावर गस्त करत असताना औरंगाबाद येथे ट्रॅव्हल बसची चोरी करून मालेगावरोडने धुळ्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने महामार्ग पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा रचला. सफेद रंगाची ट्रॅव्हल बस धुळ्याकडे जात असताना निदर्शनास अाली. चालकास बस थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने भरधाव वेगात पलायन केले. पथकाने पाठलाग करून चिखलओहळ परिसरात बस (एम.एच. ०५ / ८५७३) अडवली. चालक अनिस युसूफ शेख यास अटक केली. चौकशीत औरंगाबाद शहरातील सिडकोमधील एमजीएम हॉस्पिटल भागातून बस चोरी केल्याची कबुली दिली. ही बस जप्त करण्यात अाली आहे. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशोक करपे, संदीप दुनगहू, सुनील आहिरे, वसंत महाले, राजू मोरे, सुहास छत्रे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांच्यासह महामार्ग सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...