आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या जंगलातील डेरेदार वृक्षताेडप्रकरणी वनविभागाने प्राचार्य पी. के. सत्पथी व सहायक निदेशक (२) पाेपट वाघमाेडे यांच्यासह वृक्षताेड करणाऱ्या माेंढे नामक इसमास दाेषी ठरवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली अाहे. या कारवाईमुळे खादी ग्रामाेद्याेग अायाेग कार्यालयातील मुंबई येथील वरिष्ठ स्तरावरील चाैकशी पथक लवकरच प्रशिक्षण केंद्राच्या जंगलात धडकणार अाहे. हे वृक्षताेड प्रकरण 'दिव्य मराठी'ने उजेडात अाणले हाेते.
भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या त्रंबकराेडवरील त्र्यंबक विद्यामंदिर येथील खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या २६५ एकरावरील जंगलात अनेक माैल्यवान व अाैषधी वृक्षांची लागवड करण्यात अालेली अाहे. या घनदाट जंगलातील शेकडाे वृक्षांची कत्तल करण्यात अाली हाेती. विशेष म्हणजे या परिसराची देखभाल करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात अाल्यानंतरही एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात अाली हाेती. अायाेगाच्या प्रशिक्षण केंद्रात जाणाऱ्या येणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच नाेंद करण्यात येते असे असतानाही येथील जंगलातून ट्रकच्या ट्रक कत्तल केलेल्या वृक्षांच्या लाकडांचीदेखील परस्पर विल्हेवाट लावण्यात अालेली अाहे.
कत्तल केलेल्या वृक्षांमध्ये अांबा, चिंच, अावळा अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश असल्याचे बाेलले जात अाहे. प्रशिक्षण केंद्रातील शेवगा, पेरू, अावळा या सारख्या वृक्षांची बाग फुलविण्यात अाली हाेती. मात्र, सद्यस्थितीत तेथे फक्त फलकच सुस्थितीत दिसत असून फळबाग नष्ट करण्यात अाल्या अाहेत. राज्य व केंद्र शासनाकडूनही वृक्षलागवडीसाठी माेठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जात अाहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या प्रशिक्षण केंद्रातील माेकळ्या जागेत वृक्षांची लागवड केली हाेती.
मात्र, तेथे कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जंगलातील सुमारे २० ते २५ वर्षे जुन्या वृक्षांवर लालसेपाेटी कुऱ्हाड चालविण्यात अाली अाहे. या तस्करीमध्ये माेठी साखळी असून यावर 'दिव्य मराठी'ने प्रकाशझाेत टाकून हे प्रकरणात उजेडात अाणल्यानंतर वनविभागाने सखाेल चाैकशी करून प्राचार्यांसह सहायक निदेशक व वृक्षताेड करणाऱ्या व्यक्तीस दाेषी ठरवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली अाहे.
खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या जंगलातील वृक्षताेड प्रकरण उजेडात अाणत 'दिव्य मराठी'ने असे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. ज्याची गंभीर दखल घेत अाता संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात अाली.
महाराष्ट्र झाडेताेड अधिनियमाद्वारे कारवाई
खादी ग्रामाेद्याेग अायाेग प्रशिक्षण केंद्राच्या जंगलातील वृक्षांची विनापरवानगी कत्तल करण्यात अाल्याचे निष्पन्न झाले हाेते. त्यामुळे महाराष्ट्र झाडेताेड अधिनियमानुसार प्राचार्यांसह सहायक निदेशक व प्रत्यक्ष वृक्षताेड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली अाहे. - प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी
अाता निलंबनाची कारवाई हाेणार का?
वृक्षताेड प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्यासाठी विशेष चाैकशी समिती गठित केली जाणार अाहे. या समितीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असण्याची शक्यता अाहे. समितीची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर वनविभागाने दाेषी ठरविलेल्यांवर निलंबनासारखी कारवाई हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष लागून अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.