आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर- मागील भांडणाची कुरापत काढत एका रिक्षाचालकाने त्र्यंबकेश्वरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता कुशावर्त चौकात हा प्रकार घडला. पोलिसांनी संशयितास तत्काळ अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगावकर कुशावर्त चौकात घरासमोर परिसरातील काही नागरिकांशी चर्चा करत असताना संशयित प्रदीप विश्वनाथ अडसरे (३७) याने मागील भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली व लहान बंधू गिरीश यांना मारहाण केली. त्यानंतर लोहगावकर यांचाही गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी संशयितास पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.


दरम्यान, हा प्रकार राजकीय वादातून झाला नाही. पूर्ववैमनस्यातून घडला आहे. मतदान, मतमोजणी आणि मिरवणूक शांततेत पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. संशयितास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...