आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंंढे यांना न्यायालयात हजर राहण्याचे अादेश, 'ग्रीन फिल्ड'चे अतिक्रमण काढणे अंगलट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - न्यायालयाचे स्थगिती अादेश असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गंगापूरराेडवरील ग्रीन फिल्ड लाॅन्सचे अतिक्रमण जमीनदाेस्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका अायुक्त व अतिक्रमण उपायुक्तांना शुक्रवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता न्यायालयासमाेर समक्ष हजर राहण्याचे अादेश दिले अाहेत. न्यायालयाच्या या अादेशामुळे अतिक्रमणाची कारवाई अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या चांगलीच अंगलट अाली अाहे.

 

महापालिकेच्या वतीने साेमवारपासून लाॅन्सचे अतिक्रमण काढण्याची माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. ही माेहीम राबविताना साेमवारी सकाळी १० वाजेपासून सायंकाळपर्यंत गंगापूरराेडवरील पूररेषेत असणाऱ्या अासाराम अाश्रमाचे अतिक्रमण जमीनदाेस्त करण्यात अाले हाेते. ही कारवाई सुरू असतानाच अतिक्रमण निर्मूलन पथकाने मते नर्सरी परिसरातील ग्रीन फिल्ड लाॅन्सचे अतिक्रमणही काढले.

 

मुळात हे अतिक्रमण काढू नये यासाठी साेमवारी (दि. २१) मुंबई उच्च न्यायालयाने अादेश दिले हाेते. न्यायालयाच्या अादेशाची प्रत दुपारी १२.३० वाजताच महापालिकेला देण्यात अाली हाेती. त्यासंदर्भात प्रत मिळाल्याचा शेराही महापालिकेकडून घेण्यात अाला. असे असतानाही महापालिकेच्या पथकाने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ग्रीन फिल्ड लाॅन्सवर बुलडाेझर फिरविला. महापालिकेने न्यायालयाच्या अादेशाचा अवमान केल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मनपा अायुक्त व अतिक्रमण उपायुक्त राेहिदास बहिरम यांना कारवाई का केली, याबाबतची विचारणा केली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयासमाेर हजर हाेण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

 

काेणतेही अादेश प्राप्त नाहीत
अाम्ही महापालिकेच्या नियमाप्रमाणे अतिक्रमणाची कारवाई केलेली अाहे. कारवाई करू नये असे काेणत्याही प्रकारचे अादेश अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत.
- राेहिदास बहिरम, अतिक्रमण उपायुक्त

बातम्या आणखी आहेत...