आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दुचाकी चोरून औरंगाबादमध्ये विक्री; दोन जण जेरबंद, साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करून औरंगाबादमध्ये विक्री करणाऱ्या औरंगाबाद येथील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. संशयितांकडून सहा लाख ६० हजारांच्या महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलेट, केटीएम कंपनीच्या दुचाकीचा समावेश आहे. सरकारवाडा पोलिसांनी ठक्कर डोम परिसरात ही कारवाई केली. 


याप्रकरणी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोधपथकांना सूचना दिल्या होत्या. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने दुचाकी आणि मोबाइल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली होती. पथकाने संशयित चंदन ब्रह्मदेव दुबे व मनीष भालचंद्र पाटणकर (दोघे, रा. औरंगाबाद) यांची नावे निष्पन्न झाली.

 

 

दोघांना औरंगाबाद येथील पंढरपूरमध्ये अटक केली. चौकशीत दोघांनी शहरातून बुलेटची चोरी केल्याची कबुली दिली. दोघांकडून सहा लाख ६० हजारांच्या सहा दुचाकी जप्त केल्या. तसेच चोरीच्या गुन्ह्यातील संशयित राहुल दिनकर गजभिये (रा. त्रिमूर्ती चौक) याच्याकडून दुचाकी जप्त केली. तसेच मोबाइल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आलिशान बाबू शेख व महेश गोरखनाथ आहिरे (रा. पंडितनगर) या दोघांकडून मोबाइल जप्त केले. म्हसरूळ गावातील गुन्हेगार रोहित बाळू खंडीझोड याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. आकाश गणेश जाधव (रा. तेलंग वस्ती) याच्याकडून २५ हजारांचे मोबाइल जप्त केले.

 

 

उपआयुक्त पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, सुनील रोहकले, ए. ए. बागूल, राजेेंद्र शेळके, प्रशांत मरकड, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, विलास देशपांडे, धनंजय शिंदे, अनिल गुंबाडे, अरुण भोये, सागर हजेरी, अमित शिंदे, गुणवंत गायकवाड, योगेश वायकंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. औरंगाबाद येथील दोघांनी शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. पथकाकडून संशयितांचा शोध सुरू आहे. 

 

महागड्या दुचाकी टार्गेट 
संशयित दोघे औरंगाबाद येथून रेल्वेने शहरात येत असत. स्थानिक चोरांच्या मदतीने बुलेट, अॅक्टिव्हा, केटीएम, पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करत होते. चोरी केलेल्या दुचाकी चालवत औरंगाबादला घेऊन जात तर काही दुचाकी ठक्कर डोम परिसरात लपवून ठेवत असत. या ठिकाणी लपवून ठेवलेल्या चार दुचाकी पथकाने जप्त केल्या. 

बातम्या आणखी आहेत...