आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनेरी येथे विजेचा धक्का लागून दोन बालकांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर- तालुक्यातील अंजनेरीजवळील दऱ्याचीवाडी येथे दोन लहान मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 


विकास गोटीराम रामसे (१२, रा. मुळेगाव) व गोरख भाऊसाहेब भोईर (१२, रा. राजूर) हे अंजनेरी येथे मामाच्या घरी राहून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत होते. रात्री उशिरापर्यंत ही मुले घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु, ती सापडली नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात अाली. पोलिसांना वाडीशेजारी विजेच्या खांबाजवळ ही मुले मृतावस्थेत मिळाली. 


विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे वीज कर्मचाऱ्यांबद्दल रोष व्यक्त होत अाहे. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी पावसाळ्याअगाेदर दुरुस्तीचे काम न केल्याने दोन बालकांना जीव गमवावा लागला असल्याने वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवसेना तालुकाप्रमुख संपत चव्हाण, उपसरपंच पंडित चव्हाण, गणेश चव्हाण, राजू बदादे, कमलू कडाळी, राजू शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम्यासाठी तलाठ्यांना बोलाविले. 

बातम्या आणखी आहेत...